भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरातील रस्ते व त्यावरील खड्डे हे समीकरण वर्षानुवर्षे शहरातील तसेच बाहेरून येणाºया जनतेला नेहमीच अनुभवयास मिळत आहेत. त्यातच शहरातील वैनगंगा नदीवर झालेल्या नवीन पुलामुळे जुन्या पुलाकडे राष्ट्रीय महामार्गाच्या ह्या अशोका हॉटेल समोरून जाणाºया जुन्या रस्त्याचा आता कुणी वालीच उरला नसल्यामुळे ह्या रस्त्यात, रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशी परिस्थिती मागील काही महिन्यांपासून असले तरी उदासिन प्रशासनामुळे जनतेला, वाहन धारकांना ह्याचा प्रचंड त्रास होत असल्यामुळे हा रस्ता संबंधित विभागाने दुरूस्त करण्याची मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. अशोका हॉटेलसमोरून जाणाºया या जुन्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यावरूनच समोर शहरातील एकमेव स्मशान घाट आहे. याच मार्गावरून बहुधा शहरातील अंत्ययात्रा स्मशानाकडे जातात, परंतु ह्या जगाचा निरोप घेणाºया त्या व्यक्तीला अंतिम यात्रा सुध्दा खड्ड्यातुनच करावी लागते हे निश्चीतच संतापजनक आहे. चार-चार फुट लांब, दीड फुट खोल असे बरेच खड्डे ह्या रस्त्यात पडले असतांना प्रशासनाचे लक्ष याकडे जावू नये हे भंडारा शहरवासियांचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.
एवढेच नाही तर या रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर धुळ असल्यामुळे एखादे जड वाहन या रस्त्यावरून गेले तर त्यामागे जाणाºया, येणाºया हलक्या वाहनधारकांना दोन मिनिटे थांबून धुळ निघून जाण्याची वाट बघावी लागते. परंतु हा रस्ता वळण रस्ता असल्यामुळे सनμलॅग, अदानी पॉवर प्लॅन्टकडे जाणारी जड वाहतुक, ट्रेलर सारखी वाहनांची दिवसभर जा-ये सुरू असल्यामुळे रस्त्यावरील धुळीचा नागरिकांना प्रचंड त्रास होतो. त्यामुळे शहरातील नागरीकांना खड्ड्यांचा तसेच धुळीचा होणारा त्रास लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने या रस्त्याची देखभाल ही कोणत्या विभागाची जबाबदारी आहे, हे निश्चित करून त्या विभागाला त्वरीत रस्ता दुरूस्ती करण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा नागरीकांच्या हितासाठी शिवसेना आंदोलनाच्या पवित्र्यात असेल याची जिल्हा प्रशासनाने नोंद घ्यावी, असा इशारा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भंडारा जिल्हा प्रमुख संजय रेहपाडे यांच्यासह तालुकाप्रमुख ललित बोंद्रे, वाहतुक सेना जिल्हाध्यक्ष मनीष सोनकुसरे, शहरप्रमुख आशीक चुटे, शहर संघटक शैलेश खरोले, शहर समन्वयक सोमेंद्र शहारे, चित्रागंध सेलोकर, प्रमोद बोरकर, विजय धकाते, तिलक सार्वे, टोमदेव तितीरमारे, गुरूदेव साकुरे, प्रकाश गभणे, गंगाधर निंबार्ते, निलेश चामट, पोमदेव सार्वे, मनीष बारापात्रे, संजय धकाते इ.पदाधिकाºयांनी दिला आहे