गोंदिया : मोरगाव अर्जुनी तालुक्यातील अरततोंडी / दाभणा येथील दोन चुलत भावांचा गावाशेजारील तलावात बुडुन दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना रविवारी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान उघडकिस आली. मृतकांची नावे रितीक रुपराम पातोळे वय १३ वर्ष, दुर्गेश धनंजय पातोळे वय १३ वर्षे रा.अरततोंडी अशी आहेत. तालुक्यातील अरततोंडी / दाभणा येथील रितीक रुपराम पातोळे व दुर्गेश धनंजय पातोळे हे दोन्ही चुलत भाऊ असुन गावातीलच जि.प.शाळेत इयत्ता सातवी मधे एकाच वर्गात शिकत होते. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मौजमस्ती व खेळण्यामधे दंग होते. अशातच त्यांनी पिंपळगाव- अरततोंडी मार्गावर अगदी अरततोंडी गावाला लागुनच असलेल्या तलावात सकाळी १० ते ११ वाजेच्या दरम्यान लहान लहान गोरे (बैल) धुवायला गेली होती. तलावात पाणी भरपुर असल्याने खोल पाण्यात गेले. त्यांना पोहता येत नसल्याने दोघांचाही पाण्यात बुडुन दुर्देवी मृत्यु झाला.