अपघातात एकाचा मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सालेकसा : सालेकसा ते आमगाव या मार्गावर दररोज अपघात होत असतात ही बाब आता नित्याचीच झाली आहे. कधी खराब रस्त्यांमुळे तर कधी वेगावर नियंत्रण नसल्यामुळे लोकांना जीव गमवावा लागला. यात विशेष म्हणजे पानगाव गावाजवळ अनेक अपघात घडत असून त्यात लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. शासकीय प्रशासनाकडून रस्त्यावरील वाहनचालकांसाठी अनेकवेळा जनजागृती करण्यात आली आहे, मात्र तरीही रस्त्यावरील अपघातात घट झालेली नाही.

दि. १ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास पानगाव तलावाजवळ दुचाकीचा अपघात झाला ज्यात आमगाव कडून येणाºया आणि सालेकसाच्या दिशेने येणाºया एचएफ डिलक्स दुचाकी क्रमांक एपी ५० झेड ई १२०८ चा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी सुसाट वेगाने जात होती आणि रस्त्यावरील वळणामुळे दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी झाडावर आदळली. दुचाकीचा वेग एवढा होता की विकास श्रीराम कोरे वय ४२ रा. शिवनी कला, तालुका किरणापुर जिल्हा बालाघाट यांचा जागीच मृत्यू झाला. वृत्त लिहेपर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते, तर जखमी विनयसिंह चव्हाण याला ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे उपचारासाठी आणण्यात आले आहे. याप्रकरणी सालेकसा पोलिस स्टेशनचे ठाणेदार भूषण बुराडे तपास करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *