रमाकांत खोब्रागडे / भंडारा पत्रिका तिरोडा : राज्यातील अंगणवाडी से- विकांचे प्रलंबित मागण्या करता पुन्हा आंदोलनाची सुरुवात झाली असून यामुळे अंगणवाडीतील बालकांचे पोषण आहाराचा प्रश्न उद्भवणार असून राज्यभर सुरू झालेले आंदोलना अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील सर्व अंगणवाडीच्या सेविका मदतनीस यांचा आज ५ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद कार्यालय गोंदिया वर मोर्चा व धरणे आंदोलन आयोजित केले असल्याने जिल्ह्यातील जवळपास १८०० अंगणवाड्या बंद राहून एक लक्ष २५ हजार बालके पोषण आहारापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यातील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक द्वारे राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे प्रलंबित मागण्या करता ४ फेब्रुवारी २५ पासून राज्यव्यापी आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज ५ फेब्रुवारी रोजी गोंदिया जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा जिल्हा परिषद गोंदिया व भव्य मोर्चा व आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधीक्षक व संबंधित विभागाला संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले असून यामुळे गोंदिया जिल्ह्यातील आठवी तालुक्यातील अंदाजे अठराशे अंगणवाड्या बंद राहणार असून सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस धरणे व मोर्चा आंदोलनात सामील होणार असल्याने या अंगणवाड्यामधील एक लक्ष २५ हजार बालकांना पोषण आहार मिळणार नसल्याची शक्यता असून शासनाद्वारे प्रलंबित नऊ मागण्यांवर विचार न झाल्यास पाच मार्च २५ रोजी मुंबई मंत्रालयावर राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेतर्फे देण्यात आली आहे.