भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : २३ जानेवारी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पराक्रम दिवसाचे औचित्य साधून व्हिएफआयच्या संस्थापिका अंजली साखरे यांच्या संकल्पनेतून जिल्हा सैनिक कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही,इंडियन एअर फोर्स,एनसीसी, मुंबई पोलीस,वाहतूक पोलीस,मुंबई अग्निशमन दल येथे जवानांनी केलेल्या कायार्चा कौतुक सोहळा दादर येथील वीर सावरकर स्मारक सभागृहात आयोजित करण्यात आला होता. तब्बल ३२ पराक्रमी योद्धांना येथे नॅशनल अवॉर्ड आॅफ एक्सीडेंट या पारितोषिकाने त्यांचा सत्कार करण्यात आला अतिशय सुबक सुंदर आणि तेजोमय प्रतिमा असलेल्या नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मानचिन्हाने यांचा गौरव करण्यात आला. राज्याचे माजी सैनिक कल्याण विभागाचे मंत्री शंभूराजे दैसाई व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू सोमनाथ बोस, जिल्हा सैनिक कल्याण मंडळचे अधिकारी मेजर प्रांजळ जाधव,आमदार सुनील शिंदे,महेश सावंत, राजाराम देशमुख, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिल्यांदाच पराक्रम दिवसाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी देशाच्या सैनिकांकडून शिस्त अंगी कारण्याचा मोलाचा सल्ला आपल्या भाषणात दिला.व्हिएफआयच्या सर्वेसर्वा अंजली साखरे यांच्या पुढाकाराने जिल्हा व तालुका स्तरावर असे प्रबोधनात्मक उपक्रम होणे गरजेचे असल्याच्या सूचना केल्या याची जबाबदारी व्हेलीएंट फेम आयकॉनने घ्यावी त्याला खात्याचा मंत्री या नात्याने सहयोग करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.पराक्रम दिवसाच्या आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणा म्हणून बोलविल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
सोमनाथ बोस यांनी आजोबा सुभाष चंद्र बोस यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशातील जनतेने कार्य करण्याचे आवाहन केले.आमदार सुनील शिंदे व महेश सावंत यांनी कार्यक्रमाचे नियोजनाबद्दल अभिनंदन केले.वर्षा विद्या विलास यांनी देशाचे सैनिक सीमेवर लढून रक्षण करतात व सामाजिक ८ कार्यकर्ते विविध हक्कांसाठी चळवळींच्याव्दारे लढत असतात.पराक्रम दिवसाच्या कार्यक्रमासाठी सैनिकांचे कुटुंब, हितचिंतक व रुग्ण मित्र विनोद साडविलकर व सहयोगी संस्थांचे प्रतिनिधी,रक्तमित्र आवर्जून उपस्थित होते. मेजर प्रांजल जाधव (जिल्हा सैनिक अधिकारी)यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. त्याचबरोबर ब?्याच कार्यवाही संस्था भारत नेक्स्ट, धनवृद्धी , सेवा फाऊंडेशन यांनी आपली हजेरी लावून या कार्यक्रमाचा सन्मान वाढवला. कार्यक्रमाचा कारभार सांभाळणारी संपूर्ण टीम आणि त्यात समाविष्ट असणारी काही नाव म्हणजे पत्रकार रोहिणी, नीलिमा, विद्या चित्ता आणि विशेष आभार प्रशांत तलपदे यांनी संपूर्ण जबाबदारी सांभाळून पार पाडला… या संपूर्ण कार्यक्रमाची संरक्षण दलाची भूमिका व्हेन्स कंपनीने उत्तमरीत्या सांभाळी तर प्रमुख आकर्षण म्हणजे एमडी महाविद्यालयाचे (परेल) एनसीसी गटातील मुलींनी पुरेपूर या कार्यक्रमाचा डोलारा सांभाळत आपले नेतृत्व केले..