पिंपळगाव येथील कृषी प्रदर्शनातील भंडारा जिल्हा बँकेचा माहितीप्रद स्टॉल शेतकरी बांधवाकरिता उपयुक्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : कृषिविभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व कृषी संलग्न विभाग यंत्रणा यांचे सहयोगातून मौजा पिंपळगाव सडक येथे शंकर पटाचे शताब्दी वर्षा निमित्याने दिनांक ०२ फरवरी तें दिनांक ०५ फेबुवारी पर्यंत कृषी विकास परिषद, कृषी प्रदर्शन व पशु प्रदर्शना चे आयोजन करण्यात आले आहे. याचे औचित्य साधून,सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून शेतकºयाच्या विकासाकरिता कटिबद्ध असलेल्या भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने, जिल्यातील संपूर्ण शेतकºयांना बँकेच्या विविध हितोपयोगी योजनांची माहिती व्हावी या उदात्त हेतूने, बँकेचे अध्यक्ष श्री सुनील भाऊ फुंडे यांचे संकल्पनेतून या ठिकाणी पाच माहिती प्रद स्टॉल लावण्यात आले आहे. या स्टॉल वर बँकेचे कर्मचारी स्टॉल ला भेट देणाºया शेतकरी बंधू भगिनींना भंडारा जिल्हा बँक शेतकºयांसाठी राबवत असलेल्या तसेच अन्य सर्वच विविध उपक्रमांची,विविध हितोपयोगी योजनांची माहिती शेतकºयांना अवगत करत आहे.तसेच बँकेची मोबाईल ए. टी. एम. व्हॅन, मायक्रो ए. टी. एम. पण प्रदर्शनात शेतकºयांच्या सेवे करिता सज्ज ठेवले आहे.

श्री सुनील भाऊ फुंडे यांच्या या उपक्रमाचि संपूर्ण प्रदर्शनात प्र शंसा होत असून या स्टॉल ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय बरडे आपल्या सहकारी अधिकाºयां सोबत व कर्मचाºया सोबत हात उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न शील आहेत. श्री सुनील भाऊ फुंडे व संचालक मंडळाचे संचालक दररोज स्वत: जातीने स्टॉल ला भेट देऊन या उपक्रमाची प्रगती जाणून घेत आहे.प्रदर्शना ला भेट देणाºया सर्व मान्यवरांनी या स्टॉल ला भेट देऊन कौतुक केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *