भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात दहावी व बारावीच्या परीक्षांचे सुयोग्य आणि पारदर्शक आयोजन करण्यासाठी जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक आज संपन्न झाली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी गुप्तचर यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. तसेच, भरारी पथके जिल्ह्यात कार्यरत राहतील.
महत्वाचे निर्णय : भरारी पथकांची स्थापना: जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, शिक्षणाधिकारी व इतर वरिष्ठ अधिकाºयांचे विशेष भरारी पथक काम पाहणार आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष: जिल्ह्यात २२ संवेदनशील परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून, या केंद्रांवर विशेष पथक नियुक्त केले जाईल.
प्रशासकीय कारवाईचा इशारा: परीक्षेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर फौजदारी आणि प्रशासकीय कारवाई केली जाईल.
कॉपी मुक्त परीक्षा अभियान: विद्यार्थ्यांना कोणत्याही गैरप्रकारांपासून दूर ठेवण्यासाठी शासनाने ११२ क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.
परीक्षा वेळापत्रक: बारावी लेखी परीक्षा : ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ व दहावी लेखी परीक्षा: २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५
विद्यार्थी संख्येचा आढावा: माध्यमिक केंद्रे : ८८, विद्यार्थी: १५,४६३, उच्च माध्यमिक केंद्रे: ६५, विद्यार्थी: १७,०६०
महत्वाच्या सूचना : परीक्षा केंद्रांवर अधिकारी आणि कर्मचाºयांनी मोबाईलचा वापर करू नये. कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांची तक्रार करण्यासाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित. भरारी पथकांद्वारे परीक्षा केंद्रांची नियमित तपासणी केली जाईल. परीक्षेला येणाºया विद्यार्थ्यांची मुलांची तसेच मुलींची तपासणी करण्यात येणार आहे मुलींची तपासणी महिला शिक्षिका तसा महिला अधिकाºयाकडून करण्यात येणार आहे. गैरप्रकार आढळल्यास संबंधित केंद्राची मान्यता रद्द करण्यात येईल. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. कोलते यांनी उपस्थित अधिकाºयांना परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे निर्देश दिले.