भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भात सुपीक जमिनीसह उत्कृष्ट हवामान उपलब्ध आहे. या नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य प्रकारे उपयोग करून पशुपालक शेतकºयांनी दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन क्षेत्रात क्रांती घडवावी, असे प्रतिपादन बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी केले. पिंपळगाव सडक येथे शंकरपटाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय पशुप्रदर्शन समारोप आणि पशुपालक सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पशुपालकांना पश- ुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च प्रजातीच्या गायी-म्हशींचे संगोपन करून दुग्ध व्यवसाय अधिक फायदेशीर करण्याचा सल्ला दिला. पशुपालकांसाठी सुवर्णसंधी झ्र दुग्ध क्रांतीचा नवा अध्याय या प्रसंगी मंचावर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जगन देशवट्टीवार होते. तसेच सरपंच श्याम शिवनकर, पट समितीचे अध्यक्ष नरेश नवखरे, माजी पंचायत समिती सदस्य पंकज शामकुवर, पशुधन विकास अधिकारी डॉ. सव्वाशे, डॉ. भडके, तसेच जिल्ह्यातील नावाजलेले पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनील फुंडे फुंडे पुढे म्हणाले, “विदर्भात दुग्ध व्यवसायासाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. जर शेतकºयांनी योग्य नियोजन, आधुनिक पशुपालन तंत्रज्ञान आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला, तरपशुपालन व्यवसायात मोठी प्रगती होऊ शकते.