तुमसर : लोहारा ते लेंडेझरीपर्यत ६ किलोमीटर अंतराच्या इतर जिल्हा मार्गाचे अंतर्गत रस्ता बांधकाम गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे. सदर डांबरी रस्ता कंत्राटदाराकडून पूर्ण उकरून ठेवल्याने या रस्त्यावरून प्रवास करणाºया प्रवाशांचा जीवघेणा प्रवास सुरु आहे. लोहारा ते लेंडेझरीपर्यतच्या रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येत होता त्यानंतर हा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक विभागाकडे हस्तांतरण करण्यात आला आहे. सदर रस्ता बांधकामाची किंमत २ कोटी २४ लक्ष इतकी असल्याची माहिती आहे सदर डांबरी रस्ता कंत्राटदाराकडून उकरून ठेवण्यात आले आहे त्यामुळे सदर मागार्चा काम पाहणारे अधिकाºयांच्या निष्काळजीपणामुळे या भागातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवस या रस्त्याचे काम बंद होते. जवळपास एक महिने काम बंद राहिल्याने प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करत आहे. एक महिने काम बंद ठेवून प्रधानमंत्री ग्राम सडक विभागाने नेमके काय साध्य केले अन पुन्हा काम सुरू करण्याबाबत कशी उपरती सूचली. हा सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरू लागला आहे.
यामागे नेमके काय गौडबंगाल आहे, हेही शोधण्याची गरज आहे. एक महिन्यापासून गायमुख लेंडेझरी ते लोहारा इतर जिल्हा मार्ग रस्त्याचे खोदकाम का केले? अशा पद्धतीने प्रवाशांना वेठीस धरून किंबहूना त्यांच्या जीवाशी खेळून संबधित एजन्सी व प्रधानमंत्री ग्राम सडक विभागाला नेमके काय साध्य करायचे आहे. गेल्या एक महिन्यांपासून हा रस्ता खोदून ठेवल्याने परिसरातील राहणाºया लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतुकीमुळे प्रचंड धूळ उडून ती आजूबाजूच्या परिसरात उडते अन त्याचाच जास्त त्रास व अपघातात वाढ होतो आहे. सदर रस्त्याचे काम दजेर्दार होण्यासाठी खरे तर लोकप्रतिनिधीकडून पाठपुरावा होणे गरजेचे आहे. मात्र सदर रस्त्याच्या या ढिसाळ नियोजनाबाबत त्यांनी अद्यापकोणतीही भूमिका घेतल्याचे दिसत नाही. वारंवार सांगूनही ते रस्त्याच्या बांधकामाबाबत कुठलीही उपाययोजना केली जात नसल्याने ग्रामस्थांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.