भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : पवनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध रेती वाहतूक करणारे ३ टिप्पर पवनी पोलीसांनी ताब्यात घेवून जवळपास १ कोटी ५२ लाख १६ हजारचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई ३ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. सविस्तर असे की, पोहवा किरण वसंता नागदेवे व पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांना ३ फेब्रुवारी रोजी गुप्त माहितीच्या आधारावर मौजा गुडेगाव येथे अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक सुरु असल्याबाबत खात्रीशिर माहिती मिळाल्याने ठाणेदार निलेश ब्राम्हणे, पो.शि. ढाकणे, पो. हवा. कुईकर तसेच दोन पंच प्रमोद ज्ञानेश्वर मोहरकर रा. जुनीना व अमीत देवचंद गुरे रा. चांदेवार मेडीकल जवळ पवनी यांचेसह पोलीस वाहनाने गुडेगावकडे जाण्यास गेले असता रात्री दरम्यान शिवाजी चौक गुडेगाव येथील रोडवर एकामागे एक असे एकुण ३ ट्रक पवनीचे दिशेने येताना दिसले तेव्हा सदर तिन्ही ट्रकला थांबविले व ट्रकची पाहणी केली असता ट्रॅक क्रमांक एमएच ४०/सीडी ४१७२, एमएच ३२/एजे ३३६१ व एमएच ३४/बीझेड८११४ असे तीन ट्रकमध्ये प्रत्येकी १२ ब्रास रेती भरुन असल्याचे दिसुन आले.
मालकास रेती वाहतुकीचा परवानाबाबत विचारपुस केली असता, परवाना नसल्याचे सांगीतले यावरून यातील ट्रॅक क्रमांक एमएच ४०/सीडी ४१७२ चा ट्रकचालक अब्दुल कलीम शेख हनिब वय ३६ वर्षे रा. हैदरपुरा ता. जि. अमरावती, मौहम्मद मौसीम अब्दुल लतीफ वय ३२ वर्षे रा. धनज (बु) ता. कारंजा लाड जि.वाशिम (ट्रॅक क्लिनर) ट्रॅक मालक वसीम परवेझ शेख सलीम वय ३४ वर्षे रा. अमरावती, ट्रॅक क्रमांक एमएच ३२/एजे ३३६१ ट्रक चालक फिरोज खान मोहम्मद बशिर वय २५ वर्ष नरा. कांछा कुतिल्या सोंडदेवी जि. प्रतापगड उत्तर प्रदेश, किष्णकांत अशोक कुमार यादव वय २२ वर्षे रा रा. हरिहर गंज राणीगंज जि. प्रतापगड उत्तर प्रदेश (ट्रॅक क्लिनर) ट्रॅक मालक बंटी वाघमारे वय ३५ वर्षे रा. सेलु जि. वर्धा व ट्रॅक क्रमांक ३४/बीझेड८११४ मधील ट्रक चालक देविदास नारायण चौधरी वय ४३ वर्षे रा. कॅम त. वरोरा जि. चंद्रपुर, ट्रक मालक महादेव नानाजी चाफले वय ४८ वर्षे रा. खांबाडा त. वरोरा जि. चंद्रपुर यांनी तीन्ही ट्रक मधून संगणमत करुन परवाना नसतानाही अवेधी रेती वाहतूक केरीत असताना मिळून आल्यावर सर्व आरोपींना ट्रकसह ताब्यात घेण्यात आले असून यात १ कोटी ५२ लाख १६ हजारचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सीडाम यांच्या मार्गदर्शनाखाली पवनीचे ठाणेदार निलेश ब्राम्हणे यांनी केली.