भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाºया महिलांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. जर तुमच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन असेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. शासनाने नव्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून, अंगणवाडी आणि पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन कालपासून पडताळणी करीत आहेत. चारचाकी वाहन असलेल्या महिलांना योजनेतून वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.शासनाने चारचाकी वाहन असलेल्या अर्जदारांना अपात्र घोषित करण्याचे ठरवले आहे. महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या बैठकीत राज्यभरातील अधिकाºयांना यासंदर्भात सूचना दिल्या.
बहिणीची पडताळणी सुरू,अंगणवाडी सेविका घरोघरी
