भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा -: स्थानिक मागण्यांची पूर्तता करून राज्यस्तरावरच्या मागण्यांचे शासनाकडे पाठपुरावा करू अशी माहिती आरोग्य अधिकारी मिलिंद सोमकुवर यांनी शिष्ट मंडळाला दिली. त्यांच्यासोबत कार्यक्रम अधिकारी श्री चंद्रकांत बारई होते. महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना आयटक जिल्हा भंडाराच्या वतीने राज्यव्यापी मागणी सप्ताहा च्या अनुषंगाने दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ ला युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड शिवकुमार गणवीर अध्यक्ष कॉम्रेड माधवराव बांते जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा जिल्हा परिषदेसमोर जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकांचे धरणे आंदोलन करण्यात आले. व खालील मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आशा कार्यकर्त्यांची सेवा नियमित करून आशा व ब्लॉक सुविधकांना सरकारी कर्मचारी म्हणून मान्यता देऊन योग्य वेतनश्रेणी आणि भत्ते देण्यात यावे. आशा कर्मचाºयांना २६००० व सुविधकांना ३४ हजार रुपये महिना व प्रवास भत्ता निश्चित करण्यात यावे.
दहा हजार रुपये निवृत्ती वेतन देण्यात यावे, हत्तीरोग नियंत्रण गोड्या वाटपाचे दोन वर्षाचा मोबदला इत्यादी अठरा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागण्यांच्या संदर्भात अधिकाºयांच्या सोबत झालेल्या चचेर्ची माहिती कॉम्रेड शिवकुमार गणवीर यांनी दिली. तसेच याप्रसंगी आशिषा मेश्राम, सुनंदा दहिवले, भूमिका वंजारी इत्यादी आशा कर्मचाºयांनी आपले मनोगत सादर केले. अध्यक्षीय भाषण कॉम्रेड माधवराव बांते यांनी केले. तर समारोप कॉम्रेड हिवराज उके यांनी केले. शेवटी विद्यार्थी नेते कॉम्रेड वैभव चोपकर व कॉम्रेड रवी बावणे यांनी घोषणा दिल्या. व आभार कॉम्रेड राजू बडोले यांनी मानले. आंदोलनात सुमारे हजार आशा व गटप्रवर्तक सहभागी होत्या.