भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : पोलीस स्टेशन तिरोडा अंतर्गत चिरेखणी गावाकडे अवैध रेती भरून जात असलेले ट्रॅक्टरला पोलीस उपनिरीक्षक तेजस कोंडे यांनी थांबवून विचारपूस केली असता हि रेती अवैधरित्या कवलेवाडा घाटावरून चिरेखनी येथे नेत असल्याचे सांगितल्यावरून ट्रॅक्टर चालक व मालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिपाई ज्ञानोबा श्रीरामे करीत आहे दिनांक ५ फेब्रु. २०२५ रोजी सकाळी १० वाजता दरम्यान पोलीस स्टेशन तिरोडाचे उप पोलीस निरीक्षक तेजस कोंडे, पो.शी.ईरफान शेख, कैलास ठाकरे चिरेखनी परिसरात गस्तीवर असताना कवलेवाडा कडून एक ट्रकटर येताना दिसल्यावरून त्यास थांबवून चालक राधेश्याम हिरालाल केकडे वय ३५ वर्ष रा. तिरोडा यास विचारपूस केली असता त्यांने सांगितले नुसार सदर ट्रकटर मालक नरेंद्र चुन्नीलाल भैरम अंदाजे वय ४२ वर्ष रा. कवलेवाडा ता. तिरोडा यांचा असून मी ही रेती कवलेवाडा रेती घाटावरून चिरेखणीकडे नेत असून माज्याकडे रेती वाहतुकीचा कुठलाही परवाना नसल्याचे सांगितले.
पोलीसांनी सदर ट्रॅक्टर ताब्यात घेऊन तिरोडा पोलीस स्टेशन येथे आणून फिर्यादी उप पोलीस निरीक्षक तेजस कोंडे यांचे फिर्यादी वरून आरोपी विरुद्ध कलम ३०३ (२),४९ भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा नोंद करून ट्रॅक्टर विना क्रमांकाचा निळ्या रंगाचा सोनालीका ऊक- ७३४ कंपनीचा व त्याची ट्रॉली निळ्या रंगाची विना क्रमांकाची असी असुन ट्रॉलीसह ट्रॅक्टर ची एकुण अंदाजे किमत ६ लाख ५० हजार व एक ब्रास रेती अंदाजे किंमती ६ हजार असा एकुण ६ लाख ५६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास शिपाई ज्ञानोबा श्रीरामे करीत आहे.