स्व. मनोहरभाई पटेल यांची ११९ वी जयंती निमित्त प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी होणार सुवर्ण पदकांनी सन्मानीत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया- भंडारा जिल्ह्याचे शिक्षण महर्षी तथा स्वनामधन्य नेता स्व. मनोहरभाई पटेल यांच्या ११९ व्या जयंती समारोहाचे आयोजन ९ फेब्रु. ला डी. बी. सायन्स महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात दुपारी १.०० वाजता आयोजित केले आहे. यानिमित्त दरवर्षी प्रमाणे स्व.मनोहरभाई पटेल स्मृती समिती, गोंदिया शिक्षण संस्था व गुजराती केळवणी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी व विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाºया व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण पदक व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या समारोहाचे उदघाटक म्हणून केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री माननीय श्री पीयूष गोयल, तर प्रमुख अतिथी म्हणून जुबिलेंट लाइफसायंसेज चे प्रबंध निदेशक माननीय श्री हरी शंकर भरतीया, माजी खासदार माननीय श्री नरेश गुजराल, उद्योजक माननीय श्री मोहित गुजराल ,तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष खासदार श्री प्रफुल पटेल उपस्थित राहणार आहेत.

स्वनाम धन्य नेते स्व. मनोहरभाई पटेल यांच्या जयंती निमित्त सुवर्ण पदक सोहळा व सत्कार समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्राविण्य प्राप्त गोंदिया जिल्हा मध्ये एस एस सी. मध्ये ऋषिकेश योगेशकुमार चिखलोंडे गुजराती नॅशनल हायस्कूल गोंदिया, कु. आंचल विनायक पुस्तोडे जी.एम. बी हायस्कूल अजुर्नी/मोर, एच. एस. सी. मध्ये ध्वनिल ब्रिजेशकुमार पटेल एस.एस.पटेल ज्युनियर कॉलेज गोंदिया, अभिषेक अजयकुमार अग्रवाल एस.एस.पटेल ज्युनियर कॉलेज गोंदिया, आदेश शरद देशमुख सरस्वती ज्युनियर कॉलेज अजुर्नी/मोर, बी ए पदवी मध्ये संतोष कुमार लिलाराम गावराने जगत आर्ट कॉमर्स एन्ड इंदिराबेन हरिहरभाई पटेल सायन्स कॉलेज, गोरेगाव, बी कॉम पदवीमध्ये पल्लवी अरुण बनोटे, एन एम डी महाविद्यालय गोंदिया, बी एस सी पदवीमध्ये दिव्या किशोर मस्के, धोटे बंधू सायन्स कॉलेज गोंदिया, प्राविण्य प्राप्त भंडारा जिल्हा मध्ये एस एस सी. मध्ये रिद्धी किशोर हत्तीमारे जेसिस इंग्लिश हायस्कूल भंडारा, एच एस सी. मध्ये गुंजन देवानंद कोकसे एम. पी एल नेहरू जुनिअर कॉलेज तुमसर,

बी ए पदवीमध्ये यामिनी ताम्रध्वज देशमुख जे एम पटेल महाविद्यालय भंडारा, बी कॉम पदवीमध्ये मोनिका दशरथ गायधने समर्थ महाविद्यालय लाखनी, बी एस सी पदवीमध्ये श्रेया खेमचंद निखाडे जे. एम पटेल महाविद्यालय भंडारा, बी टेक इंजिनियरींग मध्ये रिया मुकेश खन्ना एमआयइटी शहापूर गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील प्रतिभावंत विद्यार्थी व उत्कृष्ठ कामगिरी करणाºया व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार श्री राजेंद्र जैन व आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *