भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील विहिरगाव येथे उन्हाळी पीक लागवडीसाठी ट्रॅक्टरने चिखलणी करत असताना ट्रॅक्टर पलटल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेत झाडगाव येथील देविदास जागो मरस कोल्हे (वय ५४) यांचा दुदैर्वी अंत झाला. सानगडी येथील शेतकरी केवळराम गणपत इठवले (वय ६६) यांच्या सासरा परिसरातील शेतात ही दुर्घटना घडली.
चिखलणी करताना अचानक ट्रॅक्टरचा तोल जाऊन तो उलटला आणि त्याखाली दाबल्याने चालक देविदास कोल्हे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास पोलीस अश्विन भोयर करीत आहेत.