भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : महायुतीच्या राज्यात विदर्भात ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून, ती शाश्वत असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. याशिवाय, कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण आणणारा महाराष्ट्र देशात पहिला असेल, असेही ते म्हणाले. डाव्होसलाच का जाता, गुंतवणुकीची पोकळ घोषणा असल्याचा आरोप ‘मुंबईतले हितचिंतक’ वारंवार करीत असतात, असा उल्लेख करून उदय सामंत म्हणाले की, डाव्होसला जगातील सर्व कंपन्यांचे प्रमुख, सीईओ एकत्र येत असतात व व्यापारासाठी डाव्होस जगात एक अतिशय महत्त्वाचे व्यासपीठ मानले जाते. यंदा झालेल्या एकूण करारांपैकी विदर्भात ५ लाख कोटींची गुंतवणूक होतेय. ही शाश्वत असून, त्यात हजारो रोजगार मिळेल.
एक मराठी उद्योजक यवतमाळअमरावतीत कापसापासून आयुध निर्मिती करणार आहे. जेव्हापासून लीकर निर्मितीचा प्रकल्प येऊ घातला आहे. उदबत्ती क्लस्टर, अमरावतीत मेगा टेक्सटाईल पार्क झाला आहे. नव्याने येणाºया उद्योगांची जागेची गरज बघता विदर्भात ठिक-ि ठकाणी नव्याने औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी १० हजार एकर जमीन भूसंपादन केली जाणार आहे. याशिवाय, अनेकांनी उद्योगांसाठी जागा घेतलीय मात्र अनेक वषारपासून उत्पादन सुरू करू शकलेले नाहीत, त्यांच्यासोबत चर्चा करून जमीन परत घेतली जाणार आहे. विदर्भातील प्रत्येक जिल्हास्थानी उद्योग भवन उभारले जाणार असून, तेथे उद्योगासंबंंधी सर्व कार्यालये राहतील. सर्व प्रकारचे ना-हरकत प्रमाणपत्र, पर्यावरण आदी बाबींची पूर्तता केली जाईल. ४ हजार एकर जमीन यासाठी संपादित केली जाणार आहे. मराठी उद्योजकाला सर्वतोपरी मदत केली जाईल. उद्योजकांवर दादागिरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.