भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : पोलिसांनी ग्राम जमनापूर शेतशिवारातील जुगार अड्ड्यावर छापा टाकत चार आरोपींना अटक केली आहे. जुगार खेळत असलेल्या आरोपींकडून ४,९६,७८०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शाम सुदाम टेभुर्णे (४० वर्षे, रा. शिवाजी वार्ड, साकोली) राहुल अभिमन राऊत (४० वर्षे, रा. सिव्हील वार्ड, साकोली) अतुल शामदास नागदेवे (४५ वर्षे, रा. पंचशील वार्ड, साकोली),दिलीप शंकर श्रीरसागर (३८ वर्षे, रा. तलाव वार्ड, साकोली) अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ढरक विलास चौधरी ढउ लोकेश कोटवार आणि त्यांच्या टीमने सापळा रचून छापा मारला.
आरोपी बावनपती जुगार खेळत असताना रंगेहाथ सापडले.कारवाईत ४ आरोपींना अटक करण्यात आली, तर अन्य आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचांसमक्ष आरोपींची अंगझडती घेतली असता आरोपींकडून नगद रक्कम ७३,७८० , व मोटर सायकल क्रमांक टऌ ३६/अऋ-२५९१ किमत ४८,००० ,टऌ३६/अऌ-१५७७ किंमत ५०,०००रु ,टऌ ३६/ह-६२८३ किंमत ४५,०० रू, टऌ ३६/ अढ-३७४८ किंमत १,००, ००० रू , टऌ ४०/इ-५९९९ किंमत ६०,००० रू, टऌ-३६/ह- २१६६ किंमत ३०,०००/- रू , टऌ-३६/अऌ-८५०७ किंमत ९०,००० रु एकूण ४,२३,००० रू असा एकूण ४,९६,७८० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पसार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी अप. क्र. ५७/२५, कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, साकोली उपविभागीय अधिकारी कार्यालयातील पोलिसांच्या या धडक मोहीमेमुळे अवैध व्यवसायीकांचे धाबे दणाणले आहेत.