भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च २०२५ बारावी परीक्षा उद्यापासून ११ फेब्रुवारी सुरू होत आहे. यंदा परीक्षा नियोजित वेळेपेक्षा १० दिवस आधी सुरू होत असून निकालही लवकर जाहीर करण्याचा मानस आहे. १५ मे पर्यंत बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. राज्यातील पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांत परीक्षा घेतली जाणार आहे. ३३७३ मुख्य परीक्षा केंद्रे आणि ३३७६ परीक्षा उपकेंद्रांवर हीपरीक्षा पार पडणार आहे बारावी परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू होऊन १८ मार्चपर्यंत चालणार आहे.
परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करू नये, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे. यंदाच्या बारावी परीक्षेसाठी एकूण १५,०५,०३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी विज्ञान शाखा७,६८,९६७ विद्यार्थी, कला शाखा – ३,८०,४१० विद्यार्थी, वाणिज्य शाखा ३,१९,४३९ विद्यार्थी, किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रम – ३१,७३५ विद्यार्थी, टेक्निकल सायन्स -४४८६ विद्यार्थी