भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी भंडारा : कोणतीही संस्था ही एकट्याच्या मेहनतीने मोठी होत नसते या करीता सर्वांचा साथ आवश्यक असतो. अशीच भोंडेकर शिक्षण संस्था ही असंख्य कर्मचाºयांच्या मेहनतीचे फळ आहे. म्हणून संस्थेत काम करीत असतांना कुणाला लहान किंवा मोठा न आकण्याचे आवाहन आम. नरेंद्र भोंडेकर यांनी केले. ते भोंडेकर शिक्षण संस्थेच्या २३ व्या वर्धापन दिनी आयोजित कार्यक्रमास संबोधित करीत होते. या वेळी संस्थेच्या सचिव अश्विनीताई भोंडेकर, उपाध्यक्ष रमेश चावडे, बीएएमएस महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. सत्यम सुपारे, भोजराजजी भोंडेकर फिजियो थेरपी महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. शैलेन्द्र पाटील, पूजा नर्सिंग कॉलेज चे प्राचार्य डॉ. रवींद्र पुराणिक, पेस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर चे डॉ. संदीप वाणखेडे व डॉ. चंदेवार मंचावर उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करतांना आम. भोंडेकर पुढे म्हणाले की या संस्थेची सुरुवात एका छोट्याश्या रोपट्याच्या स्वरूपात झाली होती. मूठभर कर्मचाºयांच्या मेहनती नंतर आज ही संस्था मोठी झाली असून शेकडो परिवारांचा आधार झाली आहे. कारण काम करायची इच्छा असली की मार्ग निघतातच आणि तेच घडले, सर्वांच्या प्रयत्नाने आज या संस्थे अंतर्गत सुरू असलेल्या पेस रुग्णालयाच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याची संधि सर्वांना मिळत आहे. ते पुढे म्हणले की आज या रुग्णालयाच्या माध्यमातून विविध योजना राबवून रोज शेकडो रुग्णांना लाभ होत असूनयातही रुग्णालयाणी आपली गुणवत्ता राखून ठेवली आहे.
आम. भोंडेकर म्हणाले की प्रत्येक संस्थेत विविध प्रकारची लोक असतात एक चुकला म्हणून हिम्मत हारायची नसते, उलट त्याची चूक सुधारून नवीन जोमाने कामाल लागायचे आवाहन आम. भोंडेकर यांनी या वेळी केले. या वेळी उपस्थित संस्थेच्या सचिव डॉ. अश्विनीताई भोंडेकर यांनी सांगितले की २३ वर्षापूर्वी ही संस्था स्थापित झाल्या नंतर या संस्थेला मोठ करण्या करिता अथक प्रयास करण्यात आले. ज्याचे परिणाम आज सर्वांच्या समोर असून पेस रुग्णालयाला असे डॉक्टर लाभले की ते प्रत्तेक महिन्यात ४५ ते ५० आॅपरेशन करायला समर्थ आहेत. ज्या करीता डॉ. अश्विनी भोंडेकर यांनी संस्थेच्या सर्व कर्मचाºयांचे आभार सुद्धा मानले. या नंतर संस्थेच्या सर्व पदाधिकाºयांनी आपले मनोगत व्यक्त केले. सोबतच आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने संस्थेच्या विविध विभागांच्या कर्मचार्यांतर्फे पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मुख्य प्रशासकीय अधिकारी विजय खांडेरा यांनी केले.