१२ दिवस लोटनही भारतीय सनचा जवान बपत्ता

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भारतीय सेनेचा जवान सुट्टया संपल्यानंतर कर्तव्यावर रुजू होण्यासाठी दिल्लीला निघाला. रेल्वे प्रवासात असताना रात्री दरम्यान पत्नीसह मोबाईलवर गप्पा झाल्या आणि तो झोपी गेला. मात्र त्यानंतर भोपालनंतर तो अचानक गायब झाल्याने खळबळ उडाली होती मात्र १२ दिवस लोटूनही त्याचा थांगपत्ता न लागल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. भोजापूर, भंडारा येथील रहिवासी गुड्डू मुकेश सिंग गौड (२४) हा भारतीय सेनेत आहे. सध्या तो लेह लद्दाख येथे कार्यरत आहे. लग्न असल्याने तो सुट्टयावर आला होता. ११ डिसेंबर २०२४ ला दिल्ली येथे त्याचे थाटात लग्न झाले. लग्नानंतर तो नववधू पत्नीसह भंडारा येथे कुटुंबासह वास्तव्यास होता. सुट्टया संपल्याने तो ३१ डिसेंबरला गोंडवाना एक्सप्रेस रेल्वेने दिल्ली करिता रवाना झाला. परतीच्या प्रवासा दरम्यान तो रात्री भोपालच्या नंतर पत्नीसह भ्रमणध्वनीवर बोलत होता. आराम करायचे सांगून त्याने फोन ठेवला व दुसºया दिवशी दिल्लीला जाताच घरी फोन करण्याचे सांगितले. पण दुसºया दिवशी तो निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर पोहचलाच नाही.

संपूर्ण प्रवाशी खाली उतरून आपल्या पुढच्या प्रवासाला गेले. पण गुड्डूचे सामान जशाच्यातसे रेल्वे डब्यात असल्याचे सफाई कामगाराला निदर्शनास आले. शोध घेऊनही सदर प्रवासी न गवसल्याने त्याने बॅगवर असलेल्या भ्रमणध्वनी नंबरवर फोन केला. तेव्हा सदर युवक गायब असल्याचे निदर्शनास आले. पालकांना माहिती मिळताच त्यांनी निजामुद्दीन येथील नातेवाईकांना रेल्वेस्थानकावर पाठवून शोधण्यात पाठविले. मात्र शोध न लागल्याने वरठी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या घटनेला जवळपास आता तब्बल १२ दिवस झाले असून अजूनही त्या युवकाचा शोध न लागल्याने आई वडिलांची चिंता वाढली आहे. अशात दु:खी नववधू पत्नी, आईवडिल व नातेवाईक मदतीसाठी फिरत असून प्रशासनाकडून मदत व न्याय मिळविण्यासाठी दाद मागत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *