भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी मुंबई : ‘महालक्ष्मी सरस’ हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम झाला आहे. राज्यभरातील बचत गटांना हक्काचं विक्रीचा साधन उपलब्ध व्हाव यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दहा जिल्ह्यात दहा मॉल तयार करणार. टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात मॉल तयार करणार आहोत. त्याच बरोबर राज्यात आगामी कालावधीत एक कोटी लखपती दीदी करण्याचा संकल्प आहे. सध्या राज्यात १८ लाख लखपती दीदी असून मार्चपर्यंत पंचवीस लाख लखपती दीदी करणार आहोत अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. बांद्रा कुर्ला संकुल, बांद्रा, मुंबई येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान सुरू राहणाºया ‘महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन – २०२५’ चे उद्धघाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘महालक्ष्मी सरस’ हा गेली २१ वर्ष अविरत सुरू असलेला उपक्रम आहे. उमेदवार अभियानाची प्रगतीचा मी स्वत: साक्षीदार आहे. ‘उमेदच्या’ माध्यमातून ‘महालक्ष्मी सरस’ हा राज्यभरात महिला बचत गटांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा उपक्रम झाला आहे. महिला बचतगटांची उत्पादने खूप चांगली असतात. पण यांच्या विक्रीसाठी खूप उपाययोजना कराव्या लागतात. यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या परिसरात उमेद अभियानाच्या माध्यमातून मॉल उभारणार. यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. प्राथमिक स्तरावर दहा जिल्ह्यांत उमेद मॉल उभारण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दवाभाऊच्या बहिणी आता होणार लखपती
