रमाकांत खोब्रागडे / भंडारा पत्रिका तिरोडा : शासनाचे निर्देशाप्रमाणे प्रत्येक शासकीय कार्यालयात पाणी व विजेचा वापर काटकसरीने करण्याचे आदेश असले तरी तिरोडा पंचायत समितीला शासनाचे या आदेशाचा विसर पडल्याचे दिसत असून पंचायत समिती तिरोडा येथे १० आॅगस्ट २४ पासून रोषनाई करता लावलेले लाईट आजपर्यंत ही सुरू असून अनेक नागरिकांनी पंचायत समितीचे अधिकाºयांना याबाबत जाणीव करून देऊनही याकडे सर्व पंचायत समितीचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने शासकीय आदेशाचे उल्लंघन करणाºयांवर वरिष्ठांनी कार्यवाही करावी व शासकीय पैशाचा दुरुपयोग थांबवावा अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
धार्मिक सण उत्सव किंवा राष्ट्रीय दिन, उत्सवानिमित्त नागरिक आपले घर किंवा कार्यालयावर रोषनाई करतात याच प्रमाणे काही शासकीय कार्यालयावरही महत्त्वाचे राष्ट्रीय सणानिमित्त रोषणाई करण्यात येते मात्र सण उत्सव संपल्यावर हि रोषणाई काढून टाकल्या जात असतेतसेच शासनाद्वारे सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात विजेचा व पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आदेश असताना देखील पंचायत समिती तिरोडा येथे १५ आॅगस्ट राष्ट्रीय दिनानिमित्त १० आॅगस्ट २४ रोजी रोषणाई करता लावलेले लाईट जवळपास सहा महिने होऊनही आज तारखेपर्यंत सुरूच असून उपलब्ध माहितीनुसार तिरोडा पंचायत समितीत असलेले दोन वीज कनेक्शनचे मार्च २४ पासून जानेवारी २५ पर्यंत जवळपास १ लक्ष ३३ हजार रुपये विजेचे देयक पंचायत समिती तिरोडा तर्फे वीज वितरण कंपनीकडे भरण्यात आले असून १५ आॅगस्ट २४ करता केलेले रोषणाई १५ आॅगस्ट दिवाळी व २६ जानेवारी २५ होऊनही काढण्यात आले नाही ज्यामुळे रोशनाई करता लावलेले लाईटमूळे अतिरिक्त वीज वापर होत असून याचे नाहक बिल शासनाचे पैशातून भरल्या जात असून शासनाचे काटकसरीने वीज वापर करण्याचा आदेश जणू काही पंचायत समितीला लागू होत नाही का असा प्रश्न नागरिकांना पडला असून याबाबत अनेकदा काही नागरिकांनी पंचायत समितीचे अधिकाºयांना ही बाब लक्षात आणून देऊन या कार्यालयातर्फे शासनाचे पैशाचा होणारा गैरवापर थांबवावा अशी जाणीव करून दिली असली तरी याकडे पंचायत समितीचे कोणीही अधिकारी लक्ष देण्यास तयार नसून आजही येथे ही रोषणाई कायम आहे याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देऊन शासकीय रकमेचा गैरवापर थांबवून संबंधितावर कार्यवाही करावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.