भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा: सहा वर्षापासून तिरोडा पंचायत समिती येथे स्थायी खंड विकास अधिकारी नसल्याने प्रभारी अधिकाºयांच्या देखरेखी खाली कारभार सुरू असून यामुळे योग्य प्रकारे कारभार चालत असून मागील सहा महिन्यापूर्वी १५ आॅगस्टचे रोषणाई करता लावलेल लाईट सहा महिन्यापासून सुरू असल्याची बातमी प्रसिद्ध होताच आज दिनांक १२ रोजी हे लाईट काढण्यात आले.
पंचायत समिती तिरोडा येथे २०१९ पासून खंड विकास अधिकाºयांचे पद रीक्तअसून प्रभारी अधिकाºयांचे देखरेखीखाली पंचायत समितीचा कारभार सुरू असल्याने कारभार योग्य प्रकारे होत नसुन १० आॅगस्ट २४ रोजी १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या रोषणाईकरिता लावण्यात आलेले लाईट सहा महिने उलटूनही काढण्यात न आल्याने उगाच या रोषणाईचे लाईटचे विजेचेवापरामुळे शासकीय निधीचा गैरवापर होत असल्याचे अनेकदा नागरिकांनी येथील अधिकाºयांना वारंवार या प्रकाराबाबत जाणीव करून दिली असली तरी याकडे कोणीही अधिकारी, किंवा कर्मचारी लक्ष देण्यास तयार नसल्याने दिनांक १२ रोजी दैनिक पुण्यनगरीत या बाबत वृत्त प्रकाशित होताच येथील अधिकारी कर्मचाºयांचे धाबे दणाणले व आपल्यावर वरिष्ठां कडून कारवाई होईल या भीतीपोटी आज दिनांक १२ रोजी मागील सहा महिन्यापूर्वी लावलेले लाईट काढण्यात आले असून या बातमीमुळे नागरिकांनी भंडारा पत्रिकेचे आभार मानले आहे.