भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- येथील पोलिस स्टेशन हद्दीत चोºयांच्या घटनांनी लाखनी पोलिस स्टेशन परिसर हादरले असून वाढत्या चोºयांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे तर झालेल्या चोºयांचा शोध लावण्यास पोलिसांना अपयश येत आहे. त्यामुळे वाढत्या चोºयांवर अंकुश लावण्याची गरज निर्माण झाली आहे. नुकत्याच तहसील कार्यालयासमोर जयहिंद किराणा, पंचायत समिती लगत सम्राट बार व स्टेट बँक परीसरातील ग्राहक सेवा केंद्र तसेच पोलीस स्टेशन हद्दीतील खेडेगावात चोरीच्या घटना घडलेल्या असून आठवडी बाजारात मोबाइल चोºया व पाकीट मार नित्याच्याच झाल्या आहे. आता तर चोरटे शेतकºयांच्या बांधावर पोहचले असून लाखोरी शिवारातील बांधावरील रासायनिक खत, गुंडाळी पाईप, धानाचे पोते व मोटारी चोरून नेल्याने शेतकºयांवर मोठे संकट ओढवले आहे. पोलिस स्टेशन हद्दीतील लाखोरी शेतशिवारात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून झिल्ली कंपनी परिसरातील पप्पू खेडीकर यांच्या शेतातील ८ डी.ए.पी रासायनिक खताच्या पोती, बुराडे यांच्या शेतातील ३ धानाचे पोते तर खेडेपार रोडवरील प्रशांत वाघाये यांच्या शेतात ठेवलेले ३ गुंडाळी पाईप चोरून नेल्याने शहराबरोबर चोरटे शेतशिवारात चोºया होत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. या घटनावर अंकुश लावण्याचे काम पोलिसांचे असून त्या चोºयांचा शोध लावण्यास पोलिसांना अपयश येत आहे. त्यामुळे सध्या तालुक्यात चोर पोलिस खेळ सुरू असल्याच्या चर्चा आहेत. शेतकरी हंगाम सुरु झाल्यापासून तर हंगाम संपेपर्यंत शेतीपयोगी साहित्याची जुळवाजुळव करीत असतो. आणि केव्हाही कामात आणण्यासाठी साहित्य शेतात ठेवतो. मात्र शेतात ठेवलेल्या साहित्यांवर चोरट्यांची वक्र दृष्टी पडल्याने शेतीपयोगी साहित्य ठेवावे कुठे असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. जिल्ह्यात मोठे उद्योग धंदे नसल्यामुळे परिसरात बेरोजगारीचे मोठे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बरेच युवक व्यसनाधीन झाले आहेत. तसेच रेती संबंधी शासनाचे उदासीन धोरण असल्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. रेती अभावी घरकुल व इतर बांधकाम बंद असल्यामुळे तसेच कोणताही कारखाना नसल्यामुळे अनेकजन बेरोजगार आहेत तर वाढलेल्या चोºया व इतर वाढलेली गुन्हेगारी यांचा विचार केल्यास कदाचित रोजगार हाच एक पर्याय असू शकतो. त्यामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी पालक यांच्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.