भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : फार्मर आयडी च्या नावाखाली शेतकºयांनी सातबारा आधारकार्ड व बँकेशी लिंक करावा अशी नवीन अट निर्माण करून राज्य सरकार शेतकºयांना वेठीस धरण्याचे महापाप करीत असून हि अट शिथिल करून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकास वेठीस धरणे बंद करावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे संपुर्ण जिल्हयात आंदोलन उभारले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार चरण वाघमारे यांनी आज भंडारा येथे पत्रकार परिषदेतुन दिला. चरण वाघमारे पुढे म्हणाले,केंद्र सरकारने पी. एम किसान योजना जाहीर केल्यावर यापूर्वी शेतकºयांनी सातबारा,आधार कार्ड व बँकखाते शासनाच्या पोर्टलवर आॅनलाईन केले आहे. हा संपुर्ण डाटा सरकारकडे उपलब्ध असूनही राज्य सरकार शेतकºयांना विनाकारण फार्मर आयडीच्या नावाखाली वेठीस धरत आहे.
शासनाच्या या नवीन परिपत्रकात शेतकºयांनी सातबारा,आधार कार्ड बैंक खाजे व मोबाईल क्रमांक एकमेकांशी संलग्नीत करावे असा फतवा काढून अपुरे मनुष्यबळ असलेल्या महसूल विभागातील तलाठी व मंडळ अधिकाºयांवर अधिकच्या भार देत असून ही कामे सहजासहजी करणे सोपे नसून शेतकºयांना तलाठी कार्यालयाकडे अनेकदा चकरा माराव्या लागत आहे. त्यामुळे सरकारने ही अट शिथिल करावी व सर्व लाभार्थ्यांच्या फार्मरआयडी त्यांना घरपोच उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी वाघमारे यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार , कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच विवि नेते अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती केली असुन भंडारा जिल्ह्याची कार्यकारीणी तसेच सर्व तालुक्याच्या अध्यक्षांची नियुक्ती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत.
या प्रश्नांना वाचा फोडण्याचे तसेच प्रसंगी आंदोलनाची भूमिका सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने घेण्यात येणार आहे सध्या भंडारा जिल्ह्यात महायुती सरकारच्या विरोधात बोलणारे किंवा आंदोलनात्मक भूमिका घेणारे नेते किंवा पक्ष दिसत नसून अन्यायाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष संपूर्ण जिल्हाभर प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका घेणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनीपत्रकार परिषदेतून दिली आहे. पत्रकार परिषदेला अजय मेश्राम,, संजय खंडाईत, हरिश्चंद्र बंधाटे, छोटू तुरकर, जितू तुरकर,महेश रहांगडाले, निलेश सार्वे, सेवक चींधालोरे, राजेश निंबार्ते, गितेश चवळे, घनश्याम वंजारी, नितीन तलमले, राकेश हटवार, योगेश सेलोकर, भालचंद्र पाटील, नितेश मारवाडे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रेतीघाट व रेती डेपो रेती तस्करीचे केंद्र!
शासनाने जिल्ह्यातील काही रेतीघाटाचे लिलाव केले असुन काही ठिकाणी रेती डेपो उघडण्यात आले आहे.मात्र यामधुनसुध्दा मोठया प्रमाणात अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक केली जात असुन येथे नागरीकांची मोठया प्रमाणात आर्थिक लुटमार सुरू आहे.मात्र याकडे स्थानीक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष करण्याचे कारण काय? हा एक गंभिर प्रश्न नागरीकांना पडला आहे.सदर रेती माफीया व संबंधीत लोकप्रतिनिधीं यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोप आता सर्वसामान्य नागरीक करू लागले आहेत.हा सगळा प्रकार राजरोसपणे सुरू असुन या प्रकारात पोलीस विभागाचे काही अधिकारी/कर्मचारी यांचासुध्दा सहभाग असल्याचा आरोप नागरीक करीत असल्याचे चरण वाघमारे यांनी यावेळी सांगीतले. संपूर्ण महाराष्ट्रासह भंडारा जिल्ह्यात शासकीय व खाजगी बांधकाम करण्याकरता लागणारा गौण खनिज रेतीची समस्या मोठ्या प्रमाणात असून गोरगरीब जनतेला घरकुलाचे बांधकाम असो किंवा इतर लहान मोठे बांधकाम असो रेती उपलब्ध होत नसल्याने सर्वच खाजगी कामे खोळंबलेली असून सर्वसामान्य मजुरांचे हाताला काम नाही.
राज्य सरकारने सुरू केलेले रेती घाट व रेती डेपो बंद केल्याने रेती मिळणे कठीण झाले आहे परंतु शासकीय कामे राज्यस्तरीय फंडाची असोत किंवा जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायत, ग्राम तसेच पंचायतची असो या विभागाचे कामे मात्र विना रॉयल्टी राजरोसपणे सुरू असून या कामांना रॉयल्टी ची गरज नाही का ? त्यामुळे शासकीय व निमशासकीय खाजगी अशा सर्वच कामांना रेतीच्या उपलब्धते करिता जिल्ह्यातील सर्वच रेतीघाट सुरू करून रॉयल्टी अनिवार्य करावी जेणेकरून ट्रॅक्टर मालक,मोठे वाहन यांना काम मिळेल व शासकीय कामाबरोबरच व्यक्तीगत बांधकामास सहजतेने रेती उपलब्ध होऊन कोणत्याही ट्रॅक्टर मालकावर किंवा ट्रक मालकावर चोरीच्या ठपका बसणार नाही असेही वाघमारे यांनी यावेळी सांगीतले.
आता कुणाला निलंबित करणार!
नुकतीच भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष व सभापती पदाची निवडणूक संपन्न झाली. ही निवडणूक महायुतीने जिंकणे अपेक्षित असताना आणि महायुतीकडे पुरेशी संख्याबळ असतानाही अध्यक्षपद काँग्रेस पक्षाला मिळाले तर उपाध्यक्ष व सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला कसे काय मिळाले ही विचाराधीन बाब आहे. यापूर्वी अडीच वर्षाआधी भाजपचे संख्याबळ नसताना भंडारा जिल्हा परिषदेवर माझ्या विचाराच्या काही सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युती करू नये असा आग्रह धरल्याने बंडखोरी करत काँग्रेस पक्षासोबत जाऊन उपाध्यक्ष पद व एक सभापती पद भाजपकडे खेचून आणला.असे असतांना माझ्यावर पक्ष विरोधी भूमिकेचा ठपका ठेवून भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत: भंडारा येथे पत्रकार परिषद घेऊन मला निलंबित केले.मात्र अडीच वर्ष याच उपाध्यक्ष व सभापतीकडे जाऊन भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांनी आपली कामे काढून घेतली. आता मात्र भाजप सोबत एवढी दगाबाजी होऊन भाजपच्या हातात भोपळा मिळाला असला तरी हा घात करणारा भाजपातील मोठा नेता कोण? याचा साधा शोधही घेण्यात आला नाही. या सर्व प्रकरणावर भाजपच्या कोणत्याही मोठ्या नेत्यांनी किंवा पदाधिकाºयांनी साधी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया का दिली नाही ? एवढी दगाबाजी होऊन भाजप गप्प का? राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पाच सदस्य फोडणाºया नेत्याला भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व भंडा-यात येऊन पत्रकार परिषद घेऊन महायुतीतून निलंबित करणार का ? असा सवालही माजी आमदार चरण वाघमारे यांनी पत्रकार परिषद मध्ये उपस्थित केला.