भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील अदानी वीज प्रकल्पा तर्फे व कंत्राटदारा तर्फे येथील कामगारांचे कायदेशीर हक्क मिळत नसल्याने या विरोधात अनेकदा लेखी निवेदने देऊनही न्याय हक्क न मिळाल्याने १७ फेब्रुवारीचे मध्यरात्रीपासून अदानी प्रकल्पासमोर साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे निवेदन सर्व संबंधितांना दिले आहे.
तिरोडा येथील अदानी वीज प्रकल्पातर्फे येथील रोजनदारी मजुरांना त्यांचे न्याय हक्क मिळत नसल्याने महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजूर सेना तर्फे वारंवार अदानी प्रकल्पाला निवेदन देऊनही कुठल्याही प्रकारचे हक्क न मिळाल्यामुळे ३० जानेवारी रोजी अदानी प्रकल्प संचालक ,आरोग्य व सुरक्षा संचालनालय नागपूर, खासदार प्रशांत पडोळे ,आमदार विजयकुमार रहांगडाले, अप्पर कामगार आयुक्त नागपूर, सहाय्यक आयुक्त कामगार गोंदिया, जिल्हाधिकारी गोंदिया, पोलीस अधीक्षक गोंदिया, उपविभागीय अधिकारी तिरोडा, अदानी प्रकल्प मुख्य कार्यालय अहमदाबाद व सर्व संबंधितांना निवेदन देण्यात आल्याने यावर नागपूर येथील अप्पर कामगार आयुक्त यांचे कडे झालेल्या सभेनुसार सहाय्यक सह आयुक्त गोंदिया यांचेकडे १७ फेब्रुवारी रोजी सभा ठेवण्यात आली असून या सभेत अदानी प्रकल्पातर्फे दुपारी दोन वाजेपर्यंत संघटनेने दिलेले निवेदनानुसार योग्य कारवाई करण्याचे आदेश द्यावे असे सांगितलेअसून १७ तारखेला दुपारी होणारे सभेची निर्णय संघटनेला मान्य नसल्यास १७ तारखेचे रात्री १२ वाजेपासून अदानी प्रकल्पाचे ग्रे ड क्रमांक दोन समोर साखळी उपोषण आंदोलन महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजूर सेना केंद्रीय अध्यक्ष भाई चैनदासजी भालाधरे ,भाई मनोज घरडे, भाई राजू बावनकर ,सत्यानंद शेंडे, विवेक नागदेवे यांचे नेतृत्वात करण्यात येणार असून हे आंदोलन होऊ नये म्हणून अदानी प्रकल्प व तेथील कंट्रातदारा तर्फे जे कामगार या संपात आंदोलनात सहभागी होतील त्यांचे वेतन देण्यात येणार नाही व त्यांचेवर बडतफीर्ची कारवाई करण्यात येईल असे नोटीस सर्वत्र लावण्यात आले असून या विरोधात आज दिनांक १६ रोजी पोलीस स्टेशन तिरोडा येथे संघटनेतर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कवाडे यांना निवेदन देण्यात येऊन या आंदोलना दरम्यान कोणत्याही संघटनेचे पदाधिकारी व कामगारास कुठल्याही प्रकारचा अपाय झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी अदानी प्रकल्प व तेथील कंट्रातदाराची राहील असे निवेदन देण्यात आले आहे