बारूद कंपनीत स्फोट, २ मजूर ठार!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावापासून जवळच कोतवालबड्डी परिसरात आज एका बारूद कंपनीत स्फोट झाला आहे. या दुदैर्वी घटनेसंदर्भात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, स्फोटात २ कामगारांचा मृत्यू झाला आहे. शिवाय, अनेक जण जखमी झाले असून नजिकच्या जंगल परिसरातही आग लागल्याची घटना घडली आहे. स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की, काही किलोमीटरपर्यंत स्फोटीचे हादरे जाणवल्याचे नागरिक सांगत आहेत. स्फोटाची तीव्रता बघता मृतांचा आकडा वाढण्याची भिती वर्तविण्यात येत आहे. आजूबाजूच्या गावखेड्यातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

फटाक्यात भरल्या जाणारी बारूद बनविण्याचा हा कारखाना आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह पोलिस पथक, अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहीका आणि फॉरेन्सिक विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे. मुनिश मडावी (वय ३४, रा. मंडला, मध्यप्रदेश) आणि भुरा लक्ष्मण रजक (वय २५, रा. सिवनी, मध्यप्रदेश) अशी मृतक मजुरांची तर घनश्याम लोखंडे, सोहेल शेख अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एशियन फायरवर्क्स अ‍ॅण्ड एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये फटाके तयार केल्या जातात. या कंपनीत जवळापास ३१ मजूर काम करतात. आज दुपारच्या ब्लोवर मध्ये ब्लास्ट बुरुड कोळसा पावडर गरम करत असताना अचानक कंपनीमध्ये ब्लास्ट झाला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *