भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी अंतर्गत परमपूज्य परमात्मा एक सेवक मानव जागृती संस्था कांद्रीच्या वतीने भव्य सेवक संमेलन शुक्रवार दि.१४ फेब्रूवारी २०२५ ला पार पडले. बाबांनी चार तत्व, तीन शब्द,पाच नियमाची शिकवण दिली, अंधश्रद्धा व्यसनमुक्ती समाज आज पाहायला मिळत आहे. शिकवणीच्या आधारे बाबाचे सेवक सुखी आहेत. लाखोच्या घरात बाबाचे सेवक आहेत. आत्मविश्वासाने मानव धर्माची शिकवण दु:खी, कष्टी,गोरगरीब कुटुंबा पर्यंत पोहचविणार असे मार्गदर्शन आध्यात्मिक प्रमुख तथा मानव धर्म प्रचार व प्रसारीका लता बुरडे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले. बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी अंतर्गत परमपूज्य परमात्मक मानव जागृती संस्था कांद्री च्या वतीने गुरुवार दि.१३ फेब्रुवारी २०२५ ला ग्रामस्वच्छता अभियान पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच बैजू बंसोड होते.
कार्यक्रमाचे उद्घघाटक अनिल सोनवाने होते. प्रमुख पाहुणे तमुस अध्यक्ष अशोक वर्मा, ग्रा.पं.दिनेश बालपांडे, मार्गदर्शक रघु पिल्लारे हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष मोहाडी मंडळाचे उपाध्यक्ष नरेश सव्वालाखे होते. उद्घाटक आध्यात्मिक प्रमुख तथा मानव धर्म प्रचार व प्रसारीका लता दिलीप बुरडे यांच्या शुभ हस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे सचिव मोरेश्वर सार्वे, सभापती नरेश ईश्वरकर तसेच मोहाडी मंडळाचे सर्व संचालक गण कांद्री गावचे ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ सेवक सत्कारमूर्ती नत्थु बारई, जयदेव बालपांडे, मंसाराम आकरे, पवन वाघाडे, राजकुमार कुंभलकर कांद्री यांचा सत्कार करण्यात आला. प्रोत्साहन झाकी बक्षीस ११०१, आर्यन नागफासे जांब, गौरीशंकर मानकर, सुमित गिºहेपुंजे, आदित्य निमकर कांद्री, कामटे नवरगाव, अनिल आकरे झाकी बक्षीस प्रथम पुरस्कार ११००१ गौरव मोटघरे कन्हान यांना राजू पिलारेकडून, द्वितीय बक्षीस ९००१ राम नरेश बोंदरे सुकळी यांना नारायण बालपांडेकडून, तृतीय बक्षीस ६००१ रामेश्वर बोंदरे नरसिहटोला यांना सुभाष शिवरकरकडून, चतूर्थ बक्षीस ४००१ देवचंद सेलोकर रोहना यांना अनिल आकरेकडुन, पाचवा बक्षीस ३००१, संजय नागपुरे खुटसावरी यांना गौरीशंकर मानकरकडुन, सहावा बक्षीस २५०१ राजेंद्र आठोडे हिवरा यांना मनोहर गलबलेकडून देण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रम प्रोत्साहन चिन्ह शिवानी बुरडे, आरुषी गलबले, पूर्वी दरवई, प्राप्ती बारई, आरोही नान्हे, नव्या कारेमोरे, कोमल शेंडे, प्रिन्सी भिवगडे, प्रियंका हजारे, सुहानी शेंडे यांना देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापक भगवान पिल्लारे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन इंद्रपाल मते तर आभार सचिव युवराज गलबले यांनी मानले.