रमाकांत खोब्रागडे तिरोडा : दि.१५ फेब्रुवारी रोजी नागपूर येथील विधी विद्यापीठाचे प्रांगणात झालेले पदवीदान समारंभात तिरोडा येथील आदिती ज्योतीदेवी संजय सिंह बैस या विद्यार्थिनींने सात सुवर्णपदक पटकाविले. गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थिनीने सात सुवर्णपदक मिळवणारी ही पहिली विद्यार्थिनी ठरली असून तिचे गोंदिया जिल्ह्यातील सर्व स्तरातील नागरिकांतर्फे अभिनंदन होत आहे.
राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे नागपूर येथे दि. १५ फेब्रुवारी रोजी झालेले पदवीदान समारंभात सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती व विद्यापीठाचे कुलपती भूषण गवई यांचे हस्ते कुलगुरू डॉक्टर विजेंद्र कुमार यांचे उपस्थितीत झालेले पदवीदान समारंभात तिरोडा येथील आदिती ज्योतीदेवी संजय सिंह बैस या विद्यार्थिनीने सात सुवर्णपदक मिळवत पहिले स्थान मिळवले असून गोंदिया जिल्ह्यातून एकाच विद्यार्थिनीला सात सुवर्णपदक मिळण्याचा हा पहिलाच प्रसंग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून या विद्यार्थिनींनी मुले किंवा मुली मधून सर्वप्रथम येणाºयास मिळणारा हिरालाल चुडामन पटेल सुवर्णपदक, विद्यार्थिनी मधून प्रथम येणारे विद्यार्थिनीचे सुवर्णपदक तसेच न्यायशास्त्र, मालमत्ता कायदा, नागरी प्रक्रिया संहिता, पुराव्याचा कायदा व बौद्धिक संपदा हक्क या पाचही विषयात सुवर्णपदक मिळवून एकूण सात सुवर्णपदक मिळवण्याचा मान मिळवला.
कुठल्याही विषयात गोंदिया जिल्ह्यातून सात सुवर्णपदक मिळविणारी ही पहिलीच विद्यार्थिनी ठरली असून तिचे या यशाबद्दल संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील अनेक मान्यवरांसह सर्व स्तरातील नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत असून आज दिनांक १६ फेब्रुवारी रोजी तिरोडा, गोरेगाव क्षेत्राचे आमदार विजयकुमार रहांगडाले, कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडाचे सभापती जितेंद्र रहागंडाले, तिरोडा वकील संघाचे अध्यक्ष अॅडवोकेट अजय यादव, अॅडवोकेट प्रणय भांडारकर, तिरोडा नगरपरिषद माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश जयस्वाल, उपाध्यक्ष सुनील भाऊ पालांदुरकर, ममताताई बैस, पत्रकार रमाकांत खोब्रागडे, दीपक जयस्वाल, सुबोध बैस, नितीन आगाशे, लक्ष्मीनारायण दुबे यांचे सह प्रतिष्ठित नागरिक मोहन गॅनचंदानी, आनंद बैस, अतुल गजभिये, विवेक ढोरे यांचे सह अनेकानी त्यांचे घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन व मिठाई भरवून अभिनंदन केले. दैनिक भंडारा पत्रिकेला खास मुलाकात देताना अदिती ज्योतीदेवी संजय सिंह बैस यांनी सांगितले की, मी या कॉलेजची सुरुवात झाली असता काही दिवसातच कोविड-१९ मुळे कॉलेज बंद झाल्याने आॅनलाइन लेक्चर व परीक्षा होत होत्या,
यात एका वर्गातील १२० विद्यार्थ्यांपैकी केवळ १२ ते २० विद्यार्थी सामील होत होते, मात्र मी संपूर्ण वेळ म्हणजे जवळपास सहा सहा तास होणारे लेक्चर अटेंड करून कॉलेज सुरू झाल्यानंतर झालेले पहिले पदवीदान समारंभात विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी तून पहिले येणारास हिरालाल चुडामन पटेल सुवर्णपदक मिळत असल्याने हे पदक आपण मिळविणारच या हेतूने अभ्यास केला. मात्र या पदवीदान समारंभात आपल्याला हिरालाल चुडामन पटेल सुवर्णपदकासह विद्यार्थीनीतून प्रथम येणारे विद्यार्थिनीस मिळणारे सुवर्णपदक, न्यायशास्त्र, मालमत्ता कायदा, नागरी प्रक्रिया संहिता, पुराव्याचा कायदा व बौद्धिक संपदा हक्क या पाच विषयातील सुवर्णपदक असे एकूण सात सुवर्णपदक मिळाले असून आपण यापुढेही सतत कायदेविषयक अभ्यास करून न्यायमूर्ती होण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तसेच आपले या यशात आई ज्योती देवी, वडील संजय सिंह बैस व बहीण परीषी यांचा सिंहाचा वाटा असल्याचे मुलाखतीत सांगितले आहे.