कपडे शिऊन घेण्याकडे तरुणाईची पाठ; टेलर व्यावसायिक आर्थिक अडचणीत

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : घरात मंगलकार्य आले की, नवीन कपडे शिवण्याचा सर्वांचा आग्रह असतो. यासाठी पूर्वी टेलरकडे दीड ते दोन महिने आधी जावे लागत होते. कपड्यांचे माप घेऊन टेलर ग्राहकाला तारीख देत. तयार केलेले कपडे त्या तारखेला जाऊन घ्याचे लागत होते त्यानंतर शुभकार्य, सणाला कपड़े घातले जात होते. त्यामळे टेलर आपल्या व्यवसायात व्यस्त होते. मात्र, सध्या रेडिमेड कपड्यांच्या जमाना, त्यात आॅनलाइन शॉपिंगची भर पडल्याने टेलरिंग व्यवसाय अडचणीत आल्याची भावना संबंधितांकडून व्यक्त होत आहे. काळानुरूप परिस्थिती बदलली आणि रेडिमेड कपड्याचा जमाना आला. त्यामुळे रेडिमेड कपडयांकडे ग्राहकांचा कल वाढू लागला आहे.

मात्र या रेडिमेड जमान्यातपारंपरिक टेलर व्यवसाय करणारे अडचणीत सापडले आहेत. अगदी काही कमी प्रमाणात नागरिक टेलरकडे जाताना आजही दिसत असले तरी तरुणाईने मात्र पूर्णपणे पाठ फिरविली आहे. परिणामी पुरुष टेलरची बिकट परिस्थिती आहे. एकेकाळी लग्न सराई, दिवाळी, दसरा या काळात टेलरला वेळ मिळत नसे परंतु, काळानुरूण बदत झाला आणि युवा वर्ग रेडिमेडकडे वळला आहे. आॅनलाइनची भर पडली असून टेलर व्यवसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे नवाव्यवसाय कोणता करावा असा प्रश्न त्यांना पडला असून इतर व्यवसायाकडे ते वळत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *