भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या फिट इंडिया मूव्हमेंटने प्रेरित होऊन, गोंदिया शिक्षण संस्था चे मार्गदर्शक, संरक्षक तथा संस्थेच्या अध्यक्षा वर्षाताई पटेल व खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्राम सेजगाव, केंद्र भानपुर येथे १३ फेब्रुवारी ते १५ फेब्रूवारी पर्यंत भव्य आरोग्य तपासणी शिबीर व नि:शुल्क औषधी वितरण कार्यक्रमाचे आयोजन सेजगाव येथील जि.प वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या आवारात रासेयो शिबिरा दरम्यान करण्यात आले. आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन संस्थेचे सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन, प्राचार्य शारदा महाजन यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.बबन मेश्राम यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
शिबीर कार्यक्रमाच्या अध्यक्षता सरपंच सोनुताई चिखलोंडे होते तर उद्घाटक म्हणून जिल्हा पोलिस वाहतूक निरीक्षक राहूल पाटिल होते. प्रमुख उपस्थितीत अँड.योगेश अग्रवाल, राजाराम चवरे, शिबिराचा एक भाग म्हणून, सेजगाव परीसरातील २५४८ विद्यार्थी, नागरीक व राष्ट्रीय सेवा योजना चे स्वयंसेवक, जि.प वरीष्ठ प्राथमिक शाळेतील तसेच आंगनवाड़ी चे विद्यार्थी यांनी मोफत आरोग्य तपासणी केली. यावेळी आॅथोर्पेडिक तज्ज्ञ आणि जनरल फिजिशियन यांच्या सल्ल्याने त्यांची रक्तातील साखर, रक्तदाब आणि ईसीजी, डोळयांची तपासणी करण्यात आली. शिबिरात महिलानी स्त्री रोगतज्ज्ञांशी सल्लामसलतही करण्यात आली होती. याप्रसंगी डॉ.अनंत चंदनकर, डॉ.आचल भगत, डॉ .स्वाती नागपूरे, डॉ.भाष्कर कांपते, पुजा पल्लवी, डॉ.पुजा ठाकरे, औषधवैद्दकियशास्त्र विभागाचे डॉ.ओवेस सिध्दिकी, नेत्र विशेषज्ञ डॉ.निशिता ठाकरे, कान,नाक,घसा विभागाचे डॉ.इशान तुरकर, स्त्री रोगशास्त्र विभागाचे डॉ.स्विटि नागपुरे, शल्यचिकित्सा शास्त्र विभागाचे डॉ.अमित इलमकर, बालरोग यज्ञ डॉ.आकाश मोरे, दंत शास्त्र विभाग चे डॉ.रीना नगराळे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भानपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी डॉ.खोब्रागडे यांनी विशेष वक्ते म्हणून फिटनेस पातळी कशी सुधारावी याविषयी जागरूकता निर्माण करणाºया परीसरातील नागरीक, विद्यार्थी यांना शिबिरा दरम्यान संबोधित केले. या उपक्रमाबद्दल बोलताना, प्रास्ताविक भाषणातून रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डाँ.बबन मेश्राम म्हणाले, ‘देशाला आरोग्यदायी बनवण्याच्या बाबतीत वैद्यकिय अधिकारी नेहमीच आघाडीवर असतात. एन.एम.डी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना चे स्वंयसेवक आव्हानात्मक परिस्थितीत काम करतात ज्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. या उपक्रमाद्वारे आम्ही रासेयो स्वंयसेवक यांना निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न करत आहोत.’ या शिबिराला ज्येष्ठ नागरिकांसह महिलांचा प्रतिसाद लाभला. या शिबिरात डॉक्टराच्या समुसह परमेश्वरी उसके, विना घारपिंडे, रोहित मिना, मेघा गुलाबे, आरती पटले, सरीता ठाकूर, अजय गजभिये, सचिन नागपुरे, गोपाल नागोसे, एन.बी कुचनकर, दुर्गाप्रसाद नागपुरे, खेलेश्वर सोनेवाने उपस्थित होते. तर शिबिराकरीता अधिष्ठाता, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय गोंदिया, जिल्हाआरोग्य अधिकारी, जि.प गोंदिया, जिल्हा शल्यचिकित्सक, के.टी.एस शासकीय रुग्णालय, आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र भानपूर यांनी विशेष सहकार्य केले.
याप्रसंगी सेजगाव चे संरपच सोनुताई चिखलोंडे म्हणाले, ग्रामीण भागात आरोग्याची जागृती होणे आवश्यक आहे. गंभीर आजार झाल्यावर ग्रामस्थ औषधोपचारासाठी धावतात. मात्र वेळेवर आजाराचे निदान झाल्यास भविष्यातील गंभीर धोके टाळता येतात. यासाठी आरोग्य शिबिर गरजूंसाठी संजीवनी ठरत आहे. अ.भा.बापु युवा संगठन चे केंद्रीय अध्यक्ष अँड.योगेश अग्रवाल म्हणाले, आरोग्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. आरोग्य सेवेतून एखाद्याचे जीव वाचविण्याचे समाधान मिळते. गरजू घटकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांना शिबिराचा आधार मिळत आहे. कार्यक्रमाचे संचालन शिबिर प्रमुख डॉ.प्रियदर्शना नंदेश्वर यांनी केले.प्रास्ताविक डॉ.तारेंन्द्र पटले यांनी तर आभार निखिल बन्सोड यांनी मानले.