भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : मागील अकरा दिवसापासून झुडूपात बस्तान मांडून बसलेल्या पट्टेदार वाघ अजूनही वनविभागाच्या हाती लागला नाही. रोज कुठे न कुठे वाघ आणि वाघाचे पगमार्क दिसतात पण, वाघ मात्र अजूनही वन विभागाच्या थैलीत आला नाही. त्यामुळे खैरलांजी आणि आसपासच्या गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोहाडी तालुक्यातील कांद्री/जांब वनक्षेत्रांतर्गत येत असलेल्या खैरलांजी येथे मागील आठ दिवसांपासून वाघाची चांगलीच बोंबाबोंब सुरू आहे. शनिवार दि. ८ फेब्रुवारी २०२५ रोजी वाघाने रानडुकराची शिकार केली आणि नंतर खैरलांजी येथील एक महिला शेतात काम करत असताना अचानक तिच्या समोरासमोर वाघ आला, तिने धावत धावत मुख्य रस्ता गाठला आणि वाघाची घटना सर्वांना सांगितली. गावकºयांनी पटकन वन विभागाशी संपर्क साधला.
वन विभागांनी स्थळ गाठून वाघोबा शोध मोहीम सुरू केली. परंतु वेगवेगळे प्रयत्न करूनही वाघाचा पत्ताच नाही. त्यामुळे नागरिकांना हैराण करणाºया पट्टेदार वाघाला जंगलात हाकलण्यासाठी वनविभागाचे पथक आटाकोट प्रयत्न करीत आहेत. खैरलांजी परिसरातील शेतशिवारात नाल्याच्या वास्तव्यात असलेला हा वाघ अजूनही सुरक्षित जागेच्या शोधातच आहे, असे बोलले जात आहे. त्या परिसरात रानडुकराची जास्तच हैदोस असल्याकारणाने परिणामी अशा परिसरात वाघाचा मुक्काम वाढत असावा अशीही चर्चा होत आहे. वनविभागाच्या पथकाने वाघाला पकडण्यासाठी दिवस- रात्र गस्त घातली आहे. वाघाच्या प्रत्येक हालचालीवर वनविभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे.
वनविभागाकडून लावलेल्या ट्रॅकिंग कॅमेºयात वाघोबा दिसला. परंतु दुसºया दिवशी वन विभागाने शोध मोहीम सुरू केली असता त्या वाघाच्या पत्ता लागलाच नाही. त्यामुळे दोन तीनदा वाघ दिसूनही गायब होणारा वाघोबा सध्या खैरलांजी व परिसरातील नागरिकांना दहशतवादी खाली ठेवून गेला आहे. वाघ कधी हल्ला करेल याचा नेम नसल्याने नागरिक एकटेटुकटे फिरतानाही काळजी घेत आहेत. दुसर- ीकडे वन विभागाला सतत पाचव्या दिवशीही वाघोबाचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे आता वनविभाग ही चांगलाच चिंतेत पडला आहे. परिणामी अजून जास्त कर्मचारी, पथके या शोधमोहिमेसाठी बोलावून या वाघालालवकरात लवकर पकडून गावकºयांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.