रेतीची अवैध वाहतूक करणाºयावर सिहोरा पोलिसांची कारवाई ५ लाखाचा मुद्देमाल जप्त

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : अवैधरित्या रेती वाहतूक करणाºया ट्रॅक्टरवर सिहोरा पोलिसांनी कारवाई करून ५ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत आकाश देवीदास रागरीकर (२०), अतुल श्रावण नंदरधने (३५) रा. परसवाडा याच्यावर सिहोरा पोलिसांनी कारवाई केली आहे.

सिहोराचे ठाणेदार विजय कसोधन हे पथकासह परसवाडा येथे पेट्रोलिंगवर असताना एमएच- ३६ / एएल- ८६५५ क्रमांकाचा ट्रॅक्टर चालक आकाश रागरीकर हा नदीपात्रातून अवैध रेती ट्रॅक्टर ट्रालीमध्ये भरून परसवाडा येथे वाहतूक करतानी मिळून आला. त्याला रॉयल्टी बाबत विचारले असता रेती वाहतुकीचा परवाना सादर न केल्याने त्याच्या ताब्यातून १ ब्रास रेतीसह ५ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी ट्रॅक्टर चालक व मालक यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उपविभागीय अधिकारी पांडुरंग गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सिहोरा चे ठाणेदार विजय कसोधन यांच्या मार्गदर्शनात पो.ह. मनोज इळपाते, अंमलदार महेश गिºिहपुंजे करीत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *