भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : जवळच असलेल्या चुल्हाड गावाने दीडशे वर्षाची परंपरा कायम राखीत एक इतिहास घडविला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही चुल्हाड गावात भव्य दिव्य व ऐतिहासिक महाप्रसाद वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संत गजानन महाराज यांचे २० फेब्रुवारीला होणाºया प्रकट दिनाचे औचित्य साधून गेल्या १५० वर्षापासून ही परंपरा गावात निरंतर जोपासली जात आहे. या दिवशी गावात एकाही कुटुंबात चुल पेटवल्या जात नाहीत. गावातील प्रत्येक मंदिरात महाप्रसाद वितरण केला जातो. या कार्यक्रमाच्या जयत तयार-ीसाठी ग्रामवासी अथक परिश्रम घेत आहेत. सात हजार लोकवस्तीच्या चुल्हाड गावात संत गजानन महाराज मंदिर, हनुमान मंदिर, दुर्गा मंदिर व शिव मंदिर अशी ८ ते १० मंदिरे आहेत. गावात गेल्या १५० वर्षापेक्षा अधिक काळापासून दहीकाला व महाप्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात येत आहे.
गावात या परंपरेचे इतिहास सांगणारी जुन्या काळातील पिढी आता ही परंपरा तरुण पिढी आजही जोपासत आहे. संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाच्या दिवशी वर्षातून एकदा गाव व मंदिर भव्यदिव्य सजविले जात आहे. गावातील प्रत्येक मंदिरात कीर्तन, भजन, दहीकाला आणि महाप्रसाद वितरण केले जात आहे. येत्या २० फेब्रुवारीला संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन असल्याने गावकरी आणि विविध मंडळाचे कार्यकर्ते गावात जय्यत तयारीच्या कामात गुंतले आहेत. कार्यक्रमाचे औचित्य साधून समाज प्रबोधन, कीर्तन आणि भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. परिसरातील १० ते १२ गावातील नागरिक महाप्रसादाच्या कार्यक्रमात सहभाग घेत असतात.