भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : पोलिस ठाणे, तुमसर आणि छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने १६ फेब्रुवारीला मातोश्री सभागृहाच्या प्रांगणात ‘शिवस्फूर्ती मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन पार पडले. स्पर्धेत मुलींच्या गटात वैशाली वंजारी प्रथम, श्रद्धा ठाकूर द्वितीय, तर सलोनी शेंडे तृतीय ठरली. मुलांच्या गटात साहिल उरकुडे प्रथम, साहिल गौरे द्वितीय, आदित्य भूरे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. दहाव्या क्रमांकापर्यंत स्पर्धकांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले. मॅरेथॉनची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, मालार्पण आणि जयघोषाने झाली. याप्रसंगी माजी नगरसेवक प्रदीप पडोळे, अभिषेक कारेमोरे, गीता कोंडेवार, कुंदाताई वैद्य, मिरा भट, किशोर चौधरी, राजेंद्र लाखनकर, शुभम मिश्रा, अनुज मलेवार, केशव चिंधालोरे, रुखमा धांडे, रमेश बोंद्रे आदी उपस्थित होते.
तुमसर शहर पोलिस ठाणे व छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजितशिवस्फूर्ती मॅराथॉनमध्ये पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर येथील तरुणाईने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अनेक स्पर्धकांनी तुमसर शहरात आदल्या रात्रीच्या सुमारास मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी पोलिस निरीक्ष्- ाक संजय गायकवाड, छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष इंजि. नितीन धांडे, सचिव अमोल उमरकर, उपाध्यक्ष विक्की साठवणे, नितीन सार्वे, हौसीलाल ठाकरे, अंकुश गभने, कोमल वानखेडे, हरीश तरटे, भूषण पडोळे, अंकित तुमसरे, सतीश दमाहे, नितीन दमाहे, मनोज बोपचे, सचिन मलेवार, बंटी लिल्हारे, संदीप फेंडर, कारण बिरांवारे, तेजस श्रीरंगे, भास्कर शेंडे, गितेश गनोरकर, मोसम वानखेडे, युवणेश धांडे, शुभम निमकर, तेजस श्रीरंग, सोनू दुपारे, साहिल धार्मिक, दिपाली मते, साक्षी चन्ने, खुशी भोयर, पूजा सिंगंजुडे, ज्योती हेडाऊ, दीपक सराटे, महाकाळकर, लिल्हारे, गनोरकर, देव्हाडी येथील मावळे तसेच तुमसर रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाºयांचे सहकार्य लाभले.