बीएसएनएलची इंनटरनेट सेवा निकामी

उल्हास तिरपुडे/भंडारा पत्रिका भंडारा : भारत संचार निगम देशभरात दूरध्वनी व भ्रमणध्वनीचे जाळे विणण्याचा प्रयत्न करून प्रत्येक नागरिकांपर्यंत त्याचा फायदा व्हावा, यासाठी धडपड करीत आहे. मात्र भंडारा शहरातील मोठा बाजार परिसरात असलेल्या निगमच्या वतीने कव्हरेज देण्याच्या सेवेत त्रृटी निर्माण होत असल्याने भ्रमणध्वनी व दुरध्वनी सेवेसह बीएसएनएल ब्रॉडबँड इंनटरनेट सेवा निकामी ठरत आहे. याकडे बीएसएनएल च्या अधिकाºयांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने ग्राहकांमध्ये असंतोष व्यक्त केल्या जात आहे. भारत संचार निगम लिमिटेड शाखा भंडारा येथील मोठा बाजार परिसरात पोस्ट आॅफिस जवळील कार्यालय अंतर्गत येत असलेल्या परिसरातील सर्वच दूरध्वनी व भ्रमणध्वनी तसेच बीएसएनएल ब्रॉडबँड इंनटरनेट सेवेचा लाभ मिळावा, असा उद्देश निगमचा आहे.

मात्र ग्राहकांना आमिष दाखवून लावण्यात आलेल्या बीएसएनएल ब्रॉडबँड इंनटरनेट सेवा व दुरध्वनीभ्रमणध्वनी सेवेकडे लक्ष देण्यासाठी या कार्यालयातील पदाधिकाºयांपासून ते कर्मचाºयांपर्यंत वेळच नसल्याने सद्यस्थितीत दूरध्वनी व भ्रमणध्वनी तसेच बीएसएनएल ब्रॉडबँड इंनटरनेट सेवा कुचकामी ठरत असल्याने ग्राहकांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे. नविन घेतलेले दूरध्वनी व भ्रमणध्वनी तसेच बीएसएनएल ब्रॉडबँड इंनटरनेट सेवा एक-दोन महिने सुरळीत असते. मात्र त्यानंतर अनेकदा तांत्रिक बिघाड येत असल्यामुळे ग्राहकांचा हिरमोड झाला. करोडो रुपए खर्चून या ग्राहकांसाठी बीएसएनएलने दूरध्वनी व भ्रमणध्वनी तसेच बीएसएनएल ब्रॉडबँड इंनटरनेट सेवांमुळे ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकारी, कर्मचाºयांच्या दुर्लक्षामुळे सद्यस्थितीत दूरध्वनीसेवा अयशस्वी झाल्यानंतर नागरिकांचा कल भ्रमणध्वनी सेवेकडे गेला.

अनेकांनी भ्रमणध्वनी खरेदी करून बीएसएनएलचे सीम वापरले. मात्र कव्हरेजअभावी भ्रमणध्वनीसेवा ठप्प झाली. परिणामी अनेक ग्राहकांनी खाजगी कंपन्यांचे सीम वापरणे सुरू केले आहे. तसेच बीएसएनएल ब्रॉडबँड इंनटरनेट सेवेचेही याच पध्दतीने कारभार चालवून ही सेवाही विस्कळीत झालेली आहे. पदाधिकारी व कर्मचाºयांच्या मनमानी कारभारामुळे व निष्काळजीपणामुळे ब्राडबँड आता काम करत नसल्याने शोभेच्या वस्तू बनत आहे. मात्र कव्हरेज का मिळत नाही, ब्रॉडबँड व्यवस्थित चालतात की नाही?, ग्राहकांच्या तक्रार व समस्या काय? याचा शोध घेण्याचा थोडासा प्रयत्नही अधिकाºयांनी केल्याचे दिसत नाही. कर्मचाºयांच्या उदासिनतेमुळे या कार्यालयीन अंतर्गत येत असलेल्या परिसरात कव्हरेज का मिळत नाही, याचा शोध घेण्याची अधिकाºयांना गरज आहे. शहरातील बीएसएनएल ब्रॉडबँड इंनटरनेट सेवा पुर्णत: ठप्प असते.

भ्रमणध्वनीवरून तक्रार केल्यावरही पदाधिकारी व कर्मचारी उडवाउडवीचे उत्तरे देवून मोकळे होतात. मात्र ग्राहकांच्या समस्या जशाच्या तशा असल्याने आता तक्रार कुणाकडे करायची? हा प्रश्न ग्राहकांपुढे उभा ठाकला आहे. काही ग्राहक तर यावर उपाय म्हणून दुसºया कंपनीच्या ब्राडबँडकडे वळल्याचे चित्र आहे. एकीकडे केंद्रशासन बीएसएनएल ची सुविधा नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध उपाययोजना करून ग्राहकांना खुश करण्याचा प्रयत्न करीत असला तरी प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत ही सेवा मिळते काय, याकडे केंद्रासह राज्य शासनाने देखील लक्ष देण्याची गरज आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *