तिरोडा : तहसील कार्यालय तिरोडाचे अवैध रेती वाहतुकीवर लक्ष ठेवणारे पथक १६ फेब्रुवारी रोजी रात्री परसवाडा मंडळात गस्तीवर असताना पथकातील नायब तहसीलदार अरविंद मोहनकर व तलाठी भुते यांना गोंडमोहाडी चौकाकडे येत असलेला ट्रॅक्टर क्रमांक ६६४७ येत असल्याचे दिसल्यावरुन त्यास थांबवून ट्रॉलीमध्ये पाहणी केली असता ट्रॉली क्रमांक एम. एच. ३५ ए जी ८७३० मध्ये एक ब्रास रेती आढळून आल्याने ट्रॅक्टर चालकास रेती वाहतुकीचा परवाना मागितला असता त्यांने आपल्याकडे कुठलाही परवाना नसल्याचे सांगितल्यावरून ट्रॅक्टर जप्त करून तिरोडा तहसील कार्यालयात जमा करण्यात येऊन ट्रॅक्टर मालकावर जमीन महसूल अधिनियम १९६६ अन्वये कार्यवाही करून १ लक्ष २३ हजार ८८३ रुपयाची दंडात्मक कारवाई करुन दिनांक १७ रोजी १ लक्ष २३ हजार ८८३ रुपये दंड वसूल करण्यात आला.
अवैध रेती वाहतूक प्रकरणी १ लक्ष २३ हजार ८८३ रुपयाचा दंड वसूल
