भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : मागील कित्येक दिवसापासूनपासून रोहणातील शेतकरी कंपनी येईल अश्या आशेने वाट पाहत आहे. भंडारा थर्मल कॉपोर्रेशन ली.हैद्राबाद. या नावाने रोहणा गावातील शेतकºयांची जमीनी जवळपास ६४० एकर जमीन २०११-१२ या वर्षामध्ये विक्री करून घेतली. गावातील शेतकºयांना कंपनी मालकांनी तुम्हाला व तुमच्या मुलांना, गावकºयाना नोकरी देऊ व एनटीपीसी मौदा ठिकाणी ज्या सुविधा आहेत. तुम्हाला उपलब्ध करून देऊ अशे खोटे आश्वासन दिले. म्हणून शेतकºयांनी या बाबीवर जातीने विचार केला. हा परिसर बावनथडी प्रकल्प मध्ये येत असून प्रकल्पाचे पाणी टेलर असल्यामुळे शेतकºयांना पाणी मिळत नव्हते. यावरचे अडचणी निर्माण होत होत्या जमिनी विकणे प्रत्यक्ष शेतकºयाच्या मनात नव्हते. परंतु मुलाचे भविष्याच्या विचार करून एनटीपीसी मौदा या ठिकाणी जे सुख सुविधा आहेत ते तुम्हा उपलब्ध करून देऊ म्हणाले.
म्हणून सन२०१११२ ला विक्री करून दिले परंतु १४ वर्षे लोटून सुद्धा कोणताही काम चालू करण्यात आले नाही. मोदी सरकारच्या निर्णयानुसार कोणती कंपनी पाच वर्षात आत कंपनी सुरू करायला पाहिजे, परंतु असे झाले नाही त्यामुळे प्रत्येक शेतकरी कामातून वंचित झाला व कर्जबाजारी झाला आर्थिक दृष्ट्या कुमकुवत झाला. आणि या कंपनी मालकांनी हे शेतजमिनी आयडी आय बँक हैदराबाद येथे गहाण केले. बँक अधिकाºयांनी ही जमीन विक-्री करण्यासाठी काढली व आपले दलाल नेमून दिले आहेत. परंतु बँक अधिकाºयांनी यांना कोणत्या शासनाची परवानगी दिली आहे. या कंपनी मालकांचे शेतकºयांची धोके झाडे केली आहेत, म्हणून भंडारा हा थर्मल पावर प्लांट यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि सर्व रोहना गावातील शेतकºयांची जमिनी पूर्ण सातबारा मध्ये शेतकºयांच्या नावाने करून देण्यात यावा अशी मागणी अन्यायग्रस्त ३६ वर्षीय शैलेश लालाजी बोंदरे रोहणा यांनी केली आहे.
ग्रामीण भागात लघुउद्योग स्थापन व्हावे-आदर्श बडवाईक
प्राप्त युवक-युवती आहेत. मात्र, कौटुंबीक जवाबदारी व कमकुवत आर्थिक परिस्थतीमुळे कौशल्य असूनही ग्रामीण भागातील युवक युवती रोजगार उभारू शकत नाही. बँकासुद्धा स्वयंरोजगारासाठी सहज कर्ज देत नसल्याने अशा बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विकास होण्यासाठी लघु उद्योग उभारण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. तरीही औद्योगिक विकासाच्या बाबतीत तालुक्यातील ग्रामीण क्षेत्र खूपच मागे आहे. ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी शासन तत्पर असूनही रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसते. ग्रामीण भागात लघु उद्योग, शेतमाल, वनसंपदा, गौण खनिज यावर आधारित प्रक्रिया उद्योग स्थापन केल्यास अनेक सुशिक्षित युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होऊ शकते. यासाठी जनप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन संबधित यंत्रणा व शासनाने चालना देण्याची गरज आहे. ग्रामीण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शेतीवर आधारित विविध उत्पादने घेतली जातात. त्यामुळे कित्येक लघु उद्योग स्थापन होऊ शकतात. मुबलक प्रमाणात उपलब्ध शासकीय जागेवर लघु उद्योग प्रकल्प स्थापन करा अशी मागणी ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींकडून अन्यायग्रस्त ३० वर्षीय आदर्श अशोक बडवाईक यांनी केली आहे.