भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील मौजा टाकळी येथील बुडीत क्षेत्राचे सर्व्हेक्षण चुकीच्या पध्दतीने करण्यात आल्याने सदर सर्व्हेक्षण नव्याने करण्यात यावे याकरीता टाकळी येथील अन्यायग्रस्त शेतकºयांनी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरूवात केली होती.त्याचा धसका घेत संबंधीत अधिकाºयांनी उपोषणस्थळी भेट देत चर्चा करून तोंडी व लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. शहरापासून १० किलोमीटर अंतरावर असलेला मौजा टाकळी त.सा. क्र. १८ येथील शेतजमीन गोसी खुर्द प्रकल्पाच्या वाढीव पाण्यामुळे बुडीत क्षेत्रात येत असल्याने गोसेखुर्द विभागाच्या वतीने शेतकºयाची शेती संपादित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली.
मात्र ते सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीने केल्याने दिनांक १७ फेब्रु. २०२५ रोजी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा भंडारा च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर रमेश निखार, सुरेश भारद्वाज, सौ. जोशना निमजे, अब्दुल अमीन शेख, संध्या कोकाटे, या शेतकºयांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाची दखल घेत गोसेखुर्द प्रकल्पाचे अधिकारी पिंपळेकर यांनी आज दिनांक १८ फेब्रु.२०२५ रोजी उपोषण मंडप भेट देत उपोषणकर्त्यांशी चर्चा करीत लेखी व तोंडी आश्वासन दिले. श्री.पिंपळेकर यांनी सदर प्रकरणाची तत्काळ चौकशी करून का- रवाई करण्यात येणार असल्याचे तसेच सध्या होणाºया रजिस्टरी थांबविण्यात आल्याचे सांगत उपोषण मागे घेण्याची विनंती केल्याने अखेर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, विष्णुदास लोणारे ,नितेश बोरकर, शेतकरी देवराव भेदे, शिवलाल रहाटे, दामोदर रहाटे, शामराव भेदे, दिलीप बोरकर, रमेश लोणारे, तसेच मोठ्या संख्येने अन्यायग्रस्त शेतकरी उपस्थित होते.