भंडारा पत्रिका / प्रतिनिधी जवाहरनगर :- राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चिखली फाटा येथे सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास दुचाकीवरून नागपुर वरून छत्तीसगडकडे जाणाºया नवदाम्पत्यास मागून येणाºया एका अज्ञात महिंद्रा पिकप वाहनाने धडक दिल्याने पती पत्नी जागीच ठार झाल्याची घटना आज घडली. नागपूर शहरातील नविन पारडी येथील रहिवासी रोशन महावीर साहू वय २८ वर्ष व त्याची पत्नी चांदणी रोशन साहू वय २३ हे दोघेही एकाच मोटार सायकलनी आज सकाळीं सहा वाजताच्या सुमारास हीरो होंडा काळया रंगाची मोटासायकल क्रमांक एम. एच.४९ बी. यु.५८६४ ने नागपूरहून छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्यातील तरोडी बोडा येथे लग्न समारंभासाठी जात होते.
भंडारा जिल्ह्यातील चिखली फाट्याजवळ यांच्या मोटारसायकल ला मागून येणाºया अज्ञात महिंद्रा पिकप वाहनाने धडक दिली ही धडक मोठी असल्याने दुचाकीस्वार असलेल्या पती-पत्नीला सुमारे शंभर फूट अंतरापर्यंत फरफकटत नेले, यात या भीषण अपघातात दोघांचाही मृत्यू झाला . जवाहर नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार भिमाजी पाटील, पीएसआय पुरुषोत्तम राठोड, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर हाके, महेश कडव हे घटनास्थळी दाखल झाले असून अपघातानंतर घटना स्थळावरून पळालेल्या महिंद्रा पिकप वाहनाचा शोध घेत आहेत.