२५ गोवंशाची सुटका

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा स्थागुशा विभागाच्या पथकाने जिल्हा परिषद चौक परिसर भंडारा येथे जनावरांची अवैध वाहतुक करणाºया दोन आयसर वाहनांवर कारवाई करीत २५ जनावरांची सुटका केली. यावेळी पोलीसांनी एकुण ३२ लाख ५६ हजार ६०० रूपयांचा चा मुद्देमाल जप्त केला. भंडारा शहरातुन अवैध गोवंशाची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती भंडारा स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.त्या आधारे पोलीस अधीक्षक नूरुल हसन व अपर पोलीस अधीक्षक, ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात भंडारा स्थागुशाचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांनी दिनांक १६ फेब्रु.२०२५ रोजी त्यांच्या पथकासह जिल्हा परिषद चौक भंडारा येथे नाकाबंदी केली.दरम्यान साकोली कडुन भंडाराकडे येणाºया दोन आयसर वाहनांना थांबवुन पाहणी केली असत्ता आयसर क्र. एमएच ४० सिटी ५४४५ मध्ये १३ व आयसर क्र. एमएच ४० सिटी ४४२५ मध्ये १२ असे एकुण २५ गोवंश जातीचे जनावरे क्रूरपणे कोंबल्याचे दिसुन आले. सदरची जनावरे ही अवैधरित्या कत्तल करन्याचे उद्देशाने वाहतुक करण्यात येत असल्याने आरोपीतांवर कारवाई करण्याकरिता जनावरांना गौशाळेत सुरक्षीततेच्या दृष्टीने पाठविण्यात आली आली आहे.

यावेळी पोलीसांनी दोन्ही आयसर वाहनांचे चालक व मालक अशा चार आरोपींविरोधात गुन्हा नोंदवित जनावरे व वाहन असा एकुण ३२ लाख ५६ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास पोलीस स्टेशन भंडारा चे अधिकारी करीत आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा चे पो. नि. नितीन चिंचोळकर, स. पो. नि. शिरीष भालेराव सोबत. पो.हवा. दोनोडे, पो. हवा. कठाणे, पो. शि. पेठे, पो. शि. ठाकरे, पो. शि. शहारे, चालक पो. शि. गजभिये यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *