तुमसर : अखंड हिंदुस्थानचे कैवारी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागात स्वराज्य युवा एकता फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उपविभागीय अभियंता प्रफुल्ल झाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी उपस्थितांच्या शुभ हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. रयतेचा राजा अशी ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्ताने या राजाचे स्मरण करण्याची संधी मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गडकोट किल्ले आजही त्यांनी दाखवलेल्या शौयार्ची प्रचिती देत आहेत, असे मत उपस्थितपाहुण्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकताना व्यक्त केले.
रयतेच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे, रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे लोककल्याणकारी शासनकर्ते, प्रजाहितदक्ष छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीदिनी अभिवादन करून सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख अमित एच मेश्राम, मिलिंद मदनकर, रवींद्र महाकाळकर, अजिंक्य गभणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रफुल्ल झाडे, शाखा अभियंता सुरेश मस्के, विनोद ढगे, कनिष्ठ अभियंता भुपेंद्र चौधरी, साधिक तुरक, सुनील सिरसाम, वरिष्ठ सहाय्यक महेश मालधारे, कनिष्ठ सहाय्यक गिरीश राऊत, राजकुमार भोयर, लता मोहनकर, गौरीशंकर मेहर यासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.