भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्हा परिषद संकुलात आज दि.१९ फेब्रु.२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक कलाम शेख यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून संबोधित केले. आपल्या संबोधनात कलाम शेख म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे ४०० वर्षानंतरही वर्तमान शासन व्यवस्थेला समर्पक आहेत. म्हणूनच महाराजांच्या पराक्रमी विचारांचा वारसा आजही जिवंत आहे. कल्याणकारी राज्याची मूळ संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कर्तृत्वातून सार्थकी केली. म्हणूनच महाराजांचा इतिहास हा जगातील अनेक देशात शिकवला जातो. समृद्ध, संपन्न व कल्याणकारी राज्याची संकल्पना सार्थकी लावण्यासाठी वर्तमान राज्यकर्त्यांनीांकल्परत व्हावे हीच खºया अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली ठरेल असे विचार कलाम शेख यांनी प्रकट केले. या वेळी बालू ठवकर, विनीत देशपांडे, पवन वंजारी, राधे भोंगाडे प्रवीण उदापुरे, बालू बनसोड, मनोज लुटे, प्रफुल शेंडे, गणेश गायधने, अजित बनसोड, रुपेश मारवाडे, जफर सय्यद, अमित हुमणे, बाबा पाटेकर, गोपाल डोकरीमारे, कृष्णा उपरीकर, आकाश ठवकर, सतीश सारवे यांसह शिवभक्त सैनिक उपस्थित होते.
शिवाजी महाराजांचे विचार हे ४०० वर्षानंतरही वर्तमान शासन व्यवस्थेला समर्पक – कलाम शेख
