भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : जादूटोणा व घरच्या व्यक्तींना जीवानिशी मारल्याचा आरोप करीत फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना पवनी तालुक्यातील मौजा चीचखेडा गावात मंगळवारी रात्री ९ वाजेदरम्यान घडला.मारोती अर्जुन चंदनबावणे (३४) असे फिर्यादीचे नाव असून सदर प्रकरणात पोलिसांनी ४० गैरकायद्याच्या मंडळीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. राज्यात सरकारकडून जादूटोण्याच्या विरोधात कायद्याची अंमलबजावणी होत असताना चीचखेडा येथे उद्भवलेला प्रकार शरमेने मान खाली घालणारा आहे. प्रस्तुत फिर्यादिवर आरोपितांकडून झालेला हल्ला जीवाशी खेळ करणारा होता. जुना चीचखेडा येथे राहणाºया फिर्यादीला उचलून चीचखेडा येथील नवीन पुनर्वसनातील समाज मंदिरात आणून आरोपितांनी बेंडून ठेवले. सदरप्रकरणाची पोलिसांना वेळीच भनक लागल्याने पुढील अनर्थ टळला.
यातील मारहाण करणाºया आरोपींमध्ये अतुल हरी जांभुळे वय अंदाजे ४० वर्ष,अंकोश श्रावण श्रीरामे वय अंदाजे ५० वर्ष, अविनाश धनराजजी बगडे वय २६ वर्ष, प्रशांत धनराज बगडे वय ४० वर्ष, दत्तु धनराज बगडे वय ४० वर्ष, शुभम राजीरामश्रीरामे वय २६ वर्ष, विनीत आसाराम मेश्राम वय ४० वर्ष, शशिकपुर गजानन गोन्नाडे वथ ५५ वर्ष, दिपक ज्ञानेश्वर तलमले वयं ४० वर्ष, रामदास अर्जुन शहारे वय ३० वर्ष, प्रविण श्रीकृष्ण उके वय ४० वर्ष, मच्छिंद्र पांडुरंगजी श्रीरामे वय ४० वर्ष, रमेश देवदास जांभुळे वय ४० वर्ष, गुडू रामदास जांभुळे वय ३५ वर्ष, ज्ञानेश्वर गणपत जांभुळे वय ५० वर्ष, अंताराम ज्ञानेश्वर तलमले वय २२ वर्ष, नितीन मोरेश्वर वाघमारे अंदाजे २७ वर्ष, नरेश वामण कुंभारे वय ४५ वर्ष,चेतन धर्मराज गोन्नाडे वय २७ वर्ष,
ईश्वर नमु गजभिये वय २५ वर्ष, बाला आनंदराव रामटेके वय २६ वर्ष, विक्की प्रदिप बागडे वय ३५ वर्ष, विष्णु शशि गोन्नाडे वय २३ वर्ष, वैभव दिलीप सलामे वय २५ वर्ष, योगेश शेषराव श्रीरामे वय २२ वर्ष, अश्विन श्रीकृष्ण उके वय ३० वर्ष, निलेश दिलीप सलामे वय २७ वर्ष, अंकीत ज्ञानेश्वर चव्हाण वय २३ वर्ष, अमाय लहु श्रीरामे वय २३ वर्ष, लखन मोरेश्वर बगडे वय २३ वर्ष, अविनाश ज्ञानेश्वर तलमले वय २७ वर्ष, अश्मीता रमेश जांभुळे वय ३० वर्ष, कुंदा लहु श्रीरामे वय ३० वर्ष, वंदना प्रकाश श्रीरागे वय ३८ वर्ष, मेघा अतुल जांभुळे वय २९ वर्ष, संगिता अंकुश श्रीरामे वय ३० वर्ष, निलीमा गोरेश्वर वाघमारे वय २९ वर्ष, वृंदा तुळशीदास सलामे वय ३० वर्ष, लिलाबाई मिंताराम सलामे वय ५५ वर्ष, व प्रशिक संखपाल बगडे वय २६ वर्ष सर्व रा. चिचखेडा पुनर्वसन ता, पवनी जि. भंडारा अशी आहेत. पोलीस निरीक्षक निलेश ब्रह्मणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन पवनी येथे कायमी अपराध क्र. ४५/ २०:२५ कलम १८९ (२), १९१ (२), १९०, ३३३, ३५२, ३५१ (२) (३), १२६ (२), १२७ (२) भा.न्या संहिता सहकलम ३(२) महाराष्ट्र नरबळी प्रतिबंधक अधिनियम सह कलम १३५ महा. पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि निखिल राहाटे हे करीत आहेत.