७६ ग्रामपंचायत अंतर्गत ८२ घरकुल लाभार्थ्यांना मोहाडी पंचायत समिती सभागृहात मंजुरी पत्राचे वाटप

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : भारत सरकार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपस्थितीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत २० लक्ष घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वितरण आणि १० लक्ष घरकुल लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण समारंभाचे कार्यक्रम आॅनलाइन करण्यात आले. या कार्यक्रमा अंतर्गत पंचायत समिती मोहाडीच्या सभागृहामध्ये प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत मंजूर लाभार्थीना मंजुरी पत्र देणे, अनुदानाचा पहिला हप्ता वितरण करणे, पूर्ण झालेल्या आवासाचे गृह प्रवेश करिता ताबा देणेचा कार्यक्रम शनिवार दि.२२ फेब्रुवारी २०२५ ला दुपारी ३ ते ५.४८ वाजेपर्यंत आयोजित कार्यक्रमाचे उद्घघाटन सभापती जगदीश्वर शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सदस्य रितेश वासनिक, विठ्ठल मलेवार, बाणा सव्वालाखे, प्रिती शेंडे, आशा बोंदरे हे होते. दुपारी ३.०५ वाजता २०५ लाभार्थी यांचे स्वागत करण्यात आले. दुपारी ३.१० वाजता लाभार्थी यांचे प्रशिक्षण देण्यात आले.

दुपारी ३.४० वाजता मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. सायंकाळी ४.३५ वाजता राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण छ्र५ी र३१ीें्रल्लॅ मोहाडी पंचायत समिती सभागृहात सुरू होते. सायंकाळी ५.५० वाजता राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्न झाल्यावर मोहाडी येथे तालुकास्तर अनिरुद्ध रावजी डहाके, प्रेमलाल गोखले, अनिल पांडुरंग पवनकर, गोपीचंद राजाराम माटे, प्रभाकर भिवा मलेवार, विजय नत्थू हलमारे, लक्ष्मण सुखदेव माटे, रामभाऊ बंडू ईश्वरकर, शुभम पिरत कुथे, परमेश्वर पिरत कुथे, माणिक शंकर गजभिये, संजय गजानन नेवरे, रखु रामा कोहपरे, संजय तुळशीराम ढेंगे, राजकुमार नारायण चामट, अरविंद देवाजी उरकुडे, संदिप अतकरी, मार्कंड नत्थू सेलोकर, संतोष बाम्हणे, खुशाल ईश्वर आचरकाटे, भगवान रतीराम गाढवे, अग्यान मुन्ना बोरकर, सुगरता रामचंद्र भुरले, सुनंदा नामदेव ठवकर, रमेश नाना शेंडे, अशोक देवा राखडे, देवदास तुळशीराम पुडके, विकास श्यामराव भगत, परशुराम श्रीराम कडव, चंद्रशेखर गजानन खापेकर, प्रकाश रुखन कडू, वसंता शंकर पुडके, परमेश्वर नरेश सेलोकर, अमोल चंदन गडरीये, रक्षकनाथ गुलाबदास उचीबगले, घनशाम शंकर चाचिरे, जगदीश रामचंद्र राऊत, मोरेश्वर बाळकृष्ण डोरले, मोतीराम वारलू उके, रमेश आसाराम सेलोकर, सुशील माधोराव मानकर, विशाल माधोराव मानकर, महादेव गोविंदा गिरीपुंजे, घनशाम मारोती निमकर, गजानन मोतीराम शिवरकर, जयदेव श्रीराम भोयर,

मनोहर श्रावण किटे, लच्छिराम फुकटु दमाहे, गणेश मोडकू कारांडे, दिनेश भाऊराव खोब्रागडे, पंकज सूरजलाल गजभिये, प्रभुदास श्रीपत गजभिये, सत्यवान नथु चामट, सुभाष आसाराम गभने, चंद्रकांत राजकुमार खोब्रागडे, नितीन तेजसिंग डोंगरे, गंगाधर सोमा भुते, रवि रामदास ढबाले, ताराचंद वसंता उईके, रामप्रसाद श्रीराम नेरकर, प्राणहंस बाबुराव बांते, सूर्यभान बाबुराव नेरकर, ज्ञानेश्वर बालचंद बांते, श्रीराम श्रावण कारेमोरे, जंगलू नत्थू तलमले,नरेश राधेश्याम खराबे, मंगेश सुखदास डहाके, अरुणदयाल ज्ञानीराम नहामूर्ती, देवदास श्रावण बडवाईक, लोकनाथ रामा शेळके, सतीश भैय्या पडोळे, वसंता पांडुरंग झंझाड, सुंदरलाल दसाराम भोयर, तेजराम जगु ईश्वरकर, गंगाराम झिंगरू थोटे, लीला अर्जुन बशीने, राजेश गणेश सार्वे, भोजराम रुपचंद बोंदरे, श्रीकृष्ण गंगाराम गिरीपुंजे, गणेश राजाराम लुटे, केशोराव शेंडे, बंडू नामदेव पिल्लारे या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला दैनिक भंडारा पत्रिकाचे यशवंत थोटे, मंगेश डहाके, कृषी विस्तार अधिकारी शिवपाल भाजीपाले, डाटा एन्ट्री आॅपरेटर जगदीश मानकर, राजेश तांबूरकर (पांढराबोडी), रिषभ सुरेश हिरेखन (वरठी) प्रामुख्याने हजर होते. प्रास्ताविक गटविकास अधिकारी दिनेश ब्रिजलाल हरीणखेडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन भाग्यवंत भोयर, भिमगिरी बोदले यांनी केले. आभार नूतन बिसेन यांनी मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *