शासनातर्फे गं्रथालयीन कर्मचाºयांची थट्टा !

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: गाव तिथे ग्रंथालय असे शासनाचे धोरण आहे मात्र ग्रंथालयाला मिळणाºया तुटपुंज्या अनुदानातुन ते शक्य नसल्याने आज राज्यात ग्रंथालयाची संख्या रोडावत चालली आहे. एकिकडे अनुदान नाही तर दुसरी गं्रथालय सुसज्ज असावी आणि त्यात सर्व प्रकारची दैनिके, ग्रंथ, पुस्तकांचा संग्रह असावा, असा शासननिर्णय आहे. एकीकडे ग्रंथालयाच्या सुसज्जेवर भर देणाºया शासनाने मात्र वाचनसंस्कृतीला चालना देणाºया तेथील कर्मचाºयांच्या समस्येकडे कधीच लक्ष दिले नाही. गेल्या अनेक दशकांपासून अत्यंत तुटपुंज्या अनुदानावर राज्यातील सार्वजनिक ग्रंथालये सुरू आहेत. तेथील कर्मचाºयांना कोणताही वेतन आयोग लागू नाही. या ग्रंथालय कर्मचाºयांना मिळणाºया वेतनापेक्षा रोजगार हमी योजनेवरील मजुरांना मिळणारी मजुरी अधिक आहे. त्यामुळे शासन ग्रंथालय कर्मचाºयांची थट्टा करीत आहे, असा सूर उमटू लागला आहे.

ग्रंथालयीन कर्मचाºयांची हिच व्यथा मांडण्याकरीता विदर्भ सार्वजनिक ग्रंथालय परिषद जिल्हा भंडाराच्या वतीने दुसरे ग्रंथालय संमेलन आज २४ फेब्रुवारीला मुस्लिम लायब्ररी भंडारा येथे आयोजित करण्यात आले आले आहे अशी माहिती विदर्भ सार्वजनिक ग्रंथालय परिषदेच्या पदाधिकाºयांनी भंडारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सार्वजनिक ग्रंथालय संमेलनाचे उद्घाटन खासदार प्रशांत पडोळे हे करतील.संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष प्रदीप ढोबळे हे राहतील. प्रमुख वक्ते म्हणून डॉ.इंद्रजित ओरके, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी संजय कोलते, पोलीस अधीक्षक नरुल हसन,आमदार अभिजीत वंजारी,आमदार नाना पटोले,पुण्यनगरीचे मुख्य संपादक रमेश कुलकर्णी,शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, माजी खासदार सुनील मेंढे,आमदार नरेंद्र भोंडेकर, महाराष्ट्र राज्य ग्रंथालयाचे अध्यक्ष गजानन कोठेवार,जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ,जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष धनंजय दलाल, मुस्लिम लायब्ररीचे नईम उर रहिमत खान,सय्यद सोहेल,तुळशीराम गेडाम उपस्थित राहतील.

या संमेलनात ‘सार्वजनिक ग्रंथालयाची प्रगती व वाचन संख्या वाढवण्याकरीता येणारी आव्हाने’ या विषयावर आयोजित परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी नागपूर ग्रंथालयाचे सहाय्यक संचालक रामदास साठे हे राहतील.या विषयावर अनिल बोरगमवार, गुलाबराव मगर, डॉ.गुरुप्रसाद पाखमोडे, प्रा.मोना येवले, डॉ.जयश्री सातोकर, डॉ. प्रकाश मालेगावे,प्रा. वर्षा मेश्राम, डॉ. धनंजय गभने,डॉ. मीनाक्षी येवले आपले विचार व्यक्त करतील. ‘सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाºयांच्या व्यथा आणि शासन’या विषयावर आयोजित परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे हे राहतील.या विषयावर नंदू बंसोड,भाऊराव पत्रे, सुधीर खोब्रागडे, मनीषाताई पौनीकर आपले विचार मांडतील. या संमेलनात प्रकट मुलाखत व ग्रंथालय संदर्भातील ठराव घेण्यात येतील. संमेलनाला ग्रंथालयांचे पदाधिकारी, संचालक, कर्मचारी आणि ग्रंथप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन संमेलनाचे आयोजक वसंत मारवाडे, भावनाताई बागडे,राजू मासुरकर,आस्तिक मस्के,अशोक हुमणे, सुधीर खोब्रागडे,भूपेश बारसागडे, शेषराव शिवनकर,तीर्थराज मेश्राम ,रोशन उरकुडे,घनश्याम कानतोडे, विकास गोंधुळे,काका भोयर यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *