भंडारा पत्रिका / प्रतिनिधी वर्धा : समृद्धी महामार्गाने शिर्डीकडे जात असताना येळकेळी परिसरात (मुंबई कॅरी) ओव्हार टेक करताना झोपेची डुलकी आल्याने झालेल्या अपघातात २ जण जागीच ठार झाले. तर २ जण गँभीर जखमी झाले. हा अपघात आज २३ रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास झाली. मिळालेल्या माहितीनुसार, के ए ५१ एम येक्स ८७६१ क्रमांकच्या कार चालक नरेश (३५) रा. कुंडलो बेंगलोर हा प्रयागराज नागपूर कडून समृद्धी महामागार्ने शिर्डीकडे मुंबई कॅरिडोर ने जात असता समोरील वाहनास ओव्हरटेक करीत असतात झोपेची डुलकी आल्याने वाहन पलटी होऊन बॅरिकेटिंगला धडक दिली. यामध्ये कार चालक सुरक्षित असून चालकाची पत्नी रमेश्री रामदास व बहीण शकुंतला रामकृष्ण जागीच मरण पावल्या तर मुलगा व चालकाचा मित्र यांना डोक्याला व हाताला मार लागला. समृद्धी महामार्गाच्या अॅम्बुलन्स मधील डॉक्टर यांच्या प्रथमोपचार करून यांना सरकारी दवाखाना वर्धा येथे पाठवण्यात आले. याबाबतची माहिती पोलीस स्टेशन सावंगी यांना देण्यात आली असून पुढील कारवाई करीत आहे.
झोपेची डुलकी! समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; २ ठार
