भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा स्थानीक गुन्हे शाखा विभागाने मोहाडी येथील नायरा पेट्रोलपंप परिसरात अवैधरित्या जनावरांची वाहतुक करणाºया वाहनावर कारवाई करीत १६ जनावरांची सुटका केली.यावेळी पोलीसांनी ३० लाख ८४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. भंडारा स्थानीक गुन्हे विभागाचे पथक रात्रीच्या वेळी गस्त घालत असतांना तुमसर ते भंडारा रोड वर नायरा पेट्रोल पंप समोर मोहाडी येथे आयशर ट्रक क्र.एमएच ४०/सीएम३३५१ मध्ये गोवंश जनावरे वाहतुक करतांना संशय आल्याने वाहनाला थांबवुन त्याची पाहणी केली असता एकुण १६ गोवंश जातीचे जनावरे दाटीवाटीने कृरतेने विनाचारा पाणी शिवाय ट्रक मध्ये भरुन वाहतुक करीत असल्याचे दिसुन आले. पोलीसांनी पंचासमक्ष करीत वाहनातील १६ गोवंश जातीचे जनावरे किंमती ८४ हजार व आयशर ट्रक एमएच ४०/सीएम -३३५१ किंमती ३० लाख रूपये असा एकूण ३० लाख ८४ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.
जप्त करण्यात आलेले गोवंशाची भगिरथा गौशाला माली पार/चांदोरी येथे पालन पोषन देखभाल करीता दाखल करण्यात आले व नमुद आरोपींचे विरुध्द पो.स्टे. मोहाडी येथे अप क्र. २४/ २०२५ ११(१) (घ) (ड) (ज) (श) प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंधक करण्या बाबत अधिनीयम १९६९ सहकलम ५ (अ) महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा अन्वये कारवाई करण्यात आली. सदरची कारवाही पोलीस अधिक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक ईष्वर कातकडे, नितीन चिंचोळकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात पा.उप.नि. अनिल चांदोरे, पाटील पोलीस अंमलदार पटोले, दोनोडे, पुराम, भानारकर, पंचबुधे, कठाने मालोदे, ठाकरे यांनी पार पाडली