भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- अवैध रेती वाहतुकीवर आळा बसविण्याकरिता पोलीस स्टेशन लाखनी येथील पथकांनी अवैध रेती वाहतुक करणारे ०२ ट्रॅक्टर पकडून एकूण १४,१२, ०००/- रु. चा मुद्देमाल जप्त केला. दि. २२/०२/२०२५ चे रात्रौ वेळी लाखनी पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक अशोक बोढे हे पोलीस शिपाई बडवाईक, चालक पोलीस हवालदार लोकेश ढोक यांचेसोबत पोलीस स्टेशन परिसरात रात्रगस्त पेट्रोलींग करीत असताना दि. २३/०२/२०२५ चे सकाळी ०७:३० वा. सुमारास मौजा गुंधारा येथे एक रहअफअख 735 ऋएी कंपनीचे विना क्रमांकाचे ट्रॅक्टरचे ट्रॉलीत रेती चोरी करून अवैधरित्या वाहतुक करताना मिळून आल्याने चालक बादल हेमराज पंधरे, वय २४ वर्षे, व मालक मुकेश वासुदेव टांगले, वय ३६ वर्षे, दोन्ही रा. सुरेवाडा, ता. जि. भंडारा यांचे ताब्यातून रहअफअख 735 ऋएी कंपनीचा विना नंबरचा ट्रॅक्टर ज्याची किं. ४,००,०००/- रु. व एक निळ्या रंगाची विना नंबरची ट्रॉली किं. १,५०,०००/- रु. व एक ब्रास रेती असा एकूण ५,५६,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच पोलीस स्टेशन लाखनी लाखनी येथील पोलीस हवालदार निलेश रामटेके, पोलीस शिपाई स्वप्नील कहालकर, सचिन बुधे हे दि. २३/०२/२०२५ चे पहाटेचे वेळी अवैध रेती वाहतुक कार्यवाही करण्याकरिता पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलींग करीत असताना सकाळी ०७:३० वा. सुमारास मौजा शिवणी येथे एक खडऌठ ऊएएफए कंपनीचे विना क्रमांकाचे ट्रॅक्टरचे ट्रॉलीत रेती चोरी करून अवैधरित्या वाहतुक करताना मिळून आल्याने चालक सौरभ योगराज धार्मिक, वय २२ वर्षे, रा. गोंडेगाव, ता. लाखनी, जि. भंडारा व मालक अमोल बाळकृष्ण नागलवाडे, वय ३६ वर्षे, रा. न्याहारवाणी, ता. लाखनी, जि. भंडारा यांचे ताब्यातून खडऌठ ऊएएफए कंपनीचा विना नंबरचा ट्रॅक्टर ज्याची किं. ७,००,०००/- रु. व एक लाल रंगाची विना नंबरची ट्रॉली किं. १,५०,०००/- रु. व एक ब्रास रेती असा एकूण ८,५६,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस स्टेशन लाखनी येथे अवैध रेती वाहतुक करणारे ०२ ट्रॅक्टर पकडून पोलीसांनी एकूण १४,१२,०००/रु. चा मुद्देमाल जप्त केला. सदर कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक अशोक बोढे, पोलीस हवालदार निलेश रामटेके, लोकेश ढोक, पोलीस शिपाई स्वप्नील कहालकर, सचिन बुधे, राजू बडवाईक यांनी केलेली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास बागडे व पोलीस हवालदार रामकृष्ण बावनकुळे हे करीत आहेत.