भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : स्वच्छतेच्या संदर्भात परिवहन महामंडळाच्या तुमसर आगारात सद्यस्थितीत सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने प्रवासी वर्गातुन तिव्र संताप व्यक्त केल्या जात आहे. या आगारात स्वच्छतेच्या बाबतीत काळजी घेण्यात येते नाही. प्रवाशांना येथे स्वच्छ पिण्याच्या पाणी उपलब्ध नाही. वेळेवर प्रवाशांना नियमीत सेवा देणे, तक्रारिंचे वेळेवर निपटारा करणे गरजेचे आहे. पण आजघडीला या आगारात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असल्यामुळे प्रवासी मात्र तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. याप्रकरणी आगार व्यवस्थापक भोगे यांना प्रवाशांना होणाºया समस्या तातडीने सोडवण्यासाठी योग्य उपाययोजना करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख अमित एच मेश्राम यांनी प्रवाशांचा वतीने केली.
आगार परिसरातील प्रवाशी निवाºयात प्रत्येक ठिकाणी देखील स्वच्छता नसल्याने घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. या आगारात प्रवाशांना अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध नाही. या आगारात गेल्या सहा महिन्यांपासून डांबरी रस्ता खोदून सिमेंट काँक- ्रीट रस्ता बांधकाम करण्यासाठी मुख्य मार्गावर खोदकाम करण्यात आले असल्याने येथे शालेय विद्यार्थी व प्रवाशांना तासनतास बस मिळेपर्यंत ताटकळत रोडवर थांबण्याची वेळ येत आहे. नुकतीच परिवहन महामंडळने भरमसाठ तिकीट दरवाढ केली मात्र त्या मानाने प्रवाशांना सुविधा मिळत नसल्याने प्रवासी वर्गात संतापचे वातावरण पाहावयास मिळत आहे. स्वच्छता, साफ सफाई नसल्याने धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
या आगारात महिलांना नाईलाजास्तव आपल्या बाळांना उघड्यावरच स्तनपान करावे लागते. सोबतच महिलावर्गांना विश्रांती घेण्यासाठी विश्रमालय उपलब्ध नाही. या गंभीर बाबीकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील वरिष्ठांनी लक्ष द्यावे यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख तथा स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित एच मेश्राम, प्रदीप दिघोरे, नैतिक हरखंडे, चंद्रशेखर मोहरकर, सौरभ बावणे, गोपीचंद राऊत, सुधीर बांते, मूलचंद कंगली, चंद्रशेखर सेलोकर, गिरम ठाकरे, विनोद चौधरी, तुकाराम मोटघरे, येदुनाथ कंगाली, विनोद दिघोरे, कपिल चोपकर, अनिल रोकडे, आशिष सोनवाने आदी उपस्थित होते.